---Advertisement---

IPL 2024: हॅरी ब्रूकवर दिल्लीने पाडला पैशांचा पाऊस, तब्बल ‘एवढे’ कोटी देऊन घेतले संघात

On: मंगळवार, डिसेंबर 19, 2023 2:33 PM
Harry Brook
---Advertisement---

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे पार पडत आहे. आयपीएल 2024 हंगामासाठी मिनी लिलाव होत आहे. यामध्ये एकूण 333 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. त्यामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. या मिनी लिलावात दूसरी बोली लागलेला खेळाडू हा इंग्लंडचा धाकड फलंदाज हॅरी ब्रूक ठरला यामध्ये अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावली. पण त्या खरेदीच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली.

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) याने या आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024) 2 कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवली होती. त्याला संघात घेण्यासाठी दिल्ली (Delhi Capitals) आणि चेन्नई (Chennai Super Kings) संघात चढाओढ लागली होती, पण अखेरीस दिल्लीने (DC) त्याला 4 कोटी रुपयात आपल्या संघाचा भाग बनवले. आयपीएल 2024चा हंगाम एप्रिल-मे मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2023 हंगामात त्याला सनरायर्झस हैदराबादने तब्बल 13.25 कोटी रूपये देऊन संघात सामील केले होते. परंतु तो त्याला हंगामात जास्त काही करतो आले नाही. त्यामुळे त्याला हैदराबादने रिलीज केले होते. आयपीएलमध्ये त्याने एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याला 123 च्या स्ट्राईक रेटने केवळ 190 धावा करता आल्या. 100 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. (IPL 2024 Delhi rains money on Harry Brook)

हेही वाचा

IPLमध्ये घडला इतिहास! हैदराबादने पॅट कमिन्सवर लावली तब्बल 20 कोटींपेक्षा जास्तीची बोली, वाचा आकडा
IPL 2024 Auction: वर्ल्डकप गाजवणारा पठ्ठ्या CSKच्या ताफ्यात, रचिन ‘एवढ्या’ कोटी रुपयात बनला चेन्नईकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---