आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएल 2024 च्या हंगामात खेळताना दिसणार आहे. पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. त्याची एनसीएमध्ये चाचणी सुरू आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत तो फिट होण्याची अपेक्षा आहे. बीसीसीआयने त्याला मंजुरी दिली तरच तो यष्टीरक्षण करेल, अन्यथा आयपीएलमध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर तो लक्ष केंद्रित करेल.
यापूर्वी, रिषभ पंतबद्दल अशा चर्चा होत्या की, तो आयपीएल 2024 च्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार. परंतु या सगळ्यात पंत आयपीएल 2024 मध्ये खेळणार असल्याची बातमी समोर आली आहे. परंतू तो या हंगामात यष्टीरक्षण करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टीकरण आले नाही. जर त्याने यष्टीरक्षण केले नाही तर तो फक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणार आहे.
यापूर्वी अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली म्हणाले होते की, ऋषभ पंत आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणार आहे. ऋषभ पंतची आयपीएलमधील कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 98 आयपीएल सामन्यांमध्ये ऋषभ पंतने 147.97 च्या स्ट्राइक रेटने आणि 34.61 च्या सरासरीने 2838 धावा केल्या आहेत. या खेळाडूच्या नावावर 15 अर्धशतकांची नोंद आहे. (IPL 2024 Good news for Delhi Capitals Rishabh Pant will play in the upcoming season but there will be this condition)
महत्वाच्या बातम्या
युवराज सिंगने टीम इंडियाचा कर्णधार न बनण्याचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘सचिन आणि ग्रेग चॅपलमुळे…’
पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजाचा क्रिकेटला अलविदा; सहकाऱ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन दिला निरोप, पहा व्हिडिओ