पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे. कसोटीत सलामीच्या स्थानावर कोण खेळणार याबाबत संघातील खेळाडूंच्या प्रतिक्रियांचा फेरा सुरू आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श याने अनुभवी डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा हा आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगत कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या खेळाने प्रभावित झालेल्या मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने फॉक्स क्रिकेटशी बोलताना सांगितले की, “उस्मान ख्वाजाने गेल्या काही वर्षांत जे क्रिकेट खेळले आहे, त्याच पातळीचे क्रिकेट खेळायला मला आवडेल. एक माणूस जो काही काळ संघाबाहेर होता आणि त्याने वयाच्या 35व्या वर्षी पुनरागमन करून जे केले ते माझ्यासारख्या लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मला आशा आहे की, मी त्याचे अनुकरण करू शकेन.”
प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरून ग्रीन आणि मार्श यापैकी एकाची निवड व्यवस्थापनासाठी मोठी समस्या बनत आहे. संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींशी झुंजणारा मार्श म्हणतो की, तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियासाठी मार्शने आतापर्यंत 35 कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली असून त्याच्या नावावर 1500 हून अधिक धावा आहेत. त्याचबरोबर त्याने 45 विकेट्सही घेतल्या आहेत. दुसरीकडे, कॅमेरून ग्रीनने 24 कसोटी सामन्यांमध्ये 33.59 च्या सरासरीने एक शतक आणि सहा अर्धशतकांसह 1000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 30 विकेट्स घेतल्या आहेत.
आता 14 डिसेंबरपासून पर्थ येथे होणार्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात मिचेल मार्श आणि कॅमेरून ग्रीनपैकी कोणाला ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Mitchell Marsh to replace David Warner Describing this player as a role model he said A man who)
महत्वाच्या बातम्या
PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर
पाकिस्तानची इज्जत चव्हाट्यावर! सीनियर टीम डॉक्टराशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, तर ज्युनियर टीम मॅनेजरशिवाय यूएईत