गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोडल्यानंतर हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतोय. रविवारी तो प्रथमच अहमदाबादमध्ये खेळण्यासाठी आला. परंतु यावेळी मैदानावर उपस्थित चाहत्यांनी त्याचं जोरदार बूइंग केलं. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये दिसतंय की, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचला तेव्हा त्याचं रोहित-रोहितच्या घोषणांनी स्वागत करण्यात आलं. नाणेफेकीच्या वेळी रवी शास्त्रींनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच चाहत्यांनी बूइंग करणं चालू केलं. या दरम्यान हार्दिक पांड्या हातात माईक धरून हसत होता. याशिवाय चाहत्यांनी मैदानावर अनेक पोस्टर्स आणले होते, ज्याद्वारे त्यांनी हार्दिक प्रति आपली नाराजी व्यक्त केली.
संघ मैदानात पोहोचताच रोहित-रोहितच्या घोषणा दिल्या गेल्या. नाणेफेकीच्या या घोषणा अधिक तीव्र झाल्या. सोशल मीडियावर असे व्हिडिओ आहेत ज्यात चाहते अशा घोषणा देत आहेत. इतकंच नाही तर हार्दिक जेव्हा गोलंदाजी करायला आला तेव्हाही मैदानावरील चाहत्यांनी त्याचं बूइंग केलं.
Loud Booed at Stadium when Hardik Pandya name was announced as he bowls 1st over and got smashed
“Rohit Rohit” chants all over. He will always be my captain 💙
This is just a trailer, real picture will be at Mumbai stadium
Dil se MI 💙 pic.twitter.com/bFVyuxWcdm
— Vibhor Varshney (@nakulvibhor) March 24, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो, हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स सोडून त्याची जुनी टीम मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. येथे रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधार बनवण्यात आलं. यावरून चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
People booed Hardik so much😂😂 pic.twitter.com/75FMeVoQtI
— Archer (@poserarcher) March 24, 2024
‘X’ वर हार्दिक पांड्या आणि रोहित-रोहित देखील ट्रेंड करू लागलं आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिल् की, हार्दिक पांड्याची अहमदाबादच्या मैदानावरच नाचक्की झाली. वानखेडे स्टेडियमवर पोहोचल्यानंतर काय परिस्थिती असेल? काही प्रेक्षकांनी फलक धरले होते ज्यावर लिहिले होतं, ‘रोहित शर्मा, तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील.’ मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 27 मार्चला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध हैदराबाद येथे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितला कॅप्टन हार्दिकने चालू सामन्यात मैदानभर पळवला, फॅन्सकडून हार्दिक जोरदार ट्रोल
रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सवर अवघ्या 6 धावांनी विजय