IPLक्रिकेटटॉप बातम्या

रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सवर अवघ्या 6 धावांनी विजय

आयपीएल 2024 मध्ये आज पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 धावांनी गुजरात टायटन्सने विजय मिळवला आहे.

याबरोबरच या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर 169 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या. गुजरातने यासह हा सामना 6 धावांनी जिंकला. गुजरातच्या या विजयासह शुबमन गिल याने कर्णधार म्हणून विजयी सुरुवात केली आहे. तसेच मुंबईकडून इमपॅक्ट डेवाल्ड ब्रेव्हिस याने सर्वाधिक 46 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सकडून गोलंदाजी करताना अजमतुल्ला ओमरझाई आणि मोहित शर्माने 2 विकेट्स घेतल्या आहेत, तर आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11- हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह ,ल्यूक वुड.

गुजरात टायटन्स प्लेइंग 11- शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles