आयपीएल 2024 च्या 32व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आमची फलंदाजी मजबूत आहे आणि आम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावात दवही पडू शकते. आम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. एकावेळी एकाच सामन्याचा विचार करावा लागेल. डेथ बॉलिंग थोडी चिंतेची बाब आहे. डेव्हिड वॉर्नर टीमच्या बाहेर गेला आहे. त्याच्या जागी सुमित कुमार आलाय.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती, विकेट चांगली दिसते. काल रात्री दव नव्हतं. आजही तशीच राहील अशी आशा आहे. आम्ही गमावलेल्या सामन्यांमध्येही चांगलं क्रिकेट खेळलो आहोत. आमच्या संघात तीन बदल. साहा परत आला आहे, मिलर आणि वॉरियरनं आमच्यासाठी पदार्पण केलं आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद
गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर
यंदाच्या हंगामात दोन्ही संघांनी 6-6 सामने खेळले आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनं आतापर्यंत तीन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्यांचा पराभव झालाय. गुजरातनं शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला होता, ज्या सामन्यात त्यांनी शेवटच्या चेंडूवर तीन गडी राखून विजय मिळवला होता. गुजरात टायटन्स 6 अंकासह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.
दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स 4 अंकांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दिल्लीचा चार सामन्यांत पराभव झाला असून, त्यांना केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीनं लखनऊ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला होता.
दिल्लीसाठी जमेची बाजू म्हणजे, कर्णधार ऋषभ पंत फॉर्ममध्ये आहे. मात्र त्यांचे वेगवान गोलंदाज आतापर्यंत काही विशेष कामगिरी करू शकलेले नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया या हंगामात चांगलाच महागात पडला आहे.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात आणि दिल्ली एकूण तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी गुजरातनं दोन सामन्यांत विजय मिळवला असून दिल्लीनं एक सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘थाला’ पुढचं आयपीएल खेळणार की नाही? ‘चिन्नाथाला’नं एकाच शब्दात उत्तर दिलं, म्हणाला…
मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”
आधी राजस्थानविरुद्ध पराभव अन् आता लाखोंचा दंड, श्रेयस अय्यरला बसला दुहेरी झटका!