गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सोमवारी (13 मे) आयपीएल 2024 चा 63वा सामना होणार होता, जो पावसामुळे रद्द झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार होता. मात्र पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. यानंतर दोन्ही संघांना एक-एक गुण वाटून देण्यात आला आहे.
सामना वाहून गेल्यानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा सामना त्यांच्यासाठी करो किंवा मरो होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना जिंकून 14 गुणांचा टप्पा गाठण्याचा संघाचा प्रयत्न होता. मात्र आता ते होऊ शकणार नाही.
पुढचा सामना जिंकूनही गुजरात केवळ 13 गुणांपर्यंत पोहोचू शकेल. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संघाला किमान 14 गुण गाठायचे होते. परंतु पावसानं ही आशा धुळीस मिळवली. गुजरातनं आतापर्यंत 13 पैकी 5 सामने जिंकले आणि 7 गमावले आहेत. हा एक सामना पावसानं वाहून गेला. अशाप्रकारे गुजरातचा संघ 11 गुणांसह गुणतालिकेत 8व्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघानं प्लेऑफमधील आपलं स्थान आधीच पक्कं होतं. आता हा संघ अव्वल दोन स्थानावर राहून स्पर्धेचा शेवट करेल, हे निश्चित झालं आहे. म्हणजेच केकेआरला अंतिम सामन्यामध्ये पोहचण्यासाठी दोन वेळा संधी मिळेल. कोलकाताना आतापर्यंत 13 पैकी 9 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. एक सामना पावसानं वाहून गेला. केकेआर 19 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ना चेन्नई ना मुंबई; ही आहे आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणारी टीम
टी20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा घेऊ शकतो क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती, जाणून घ्या कारण
धोनीनं रविवारी चेपॉकमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला? ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग