आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. प्लेऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढाई सुरू आहे. आतापर्यंत फक्त कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम चारचं तिकीट मिळालं आहे. स्थिती अशी आहे की, उर्वरित 3 जागांसाठी 6 संघ पात्र ठरू शकतात.
असं झालं तर नेट रन रेटचा खेळ सुरू होईल. तुम्ही ‘नेट रन रेट’ हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, परंतु नेट रन नेट म्हणजे काय? आणि तो काढायचा कसा? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरं आम्ही या बातमीद्वारे देत आहोत.
‘नेट रन रेट’ कसा मोजला जातो?
सर्वप्रथम, हे समजून घ्या की नेट रन रेट काढण्यासाठी तुम्हाला गणितात प्रवीण असण्याची गरज नाही. नेट रन रेट संघानं गोलंदाजीमध्ये खर्च केलेल्या धावांमधून संघानं केलेल्या धावा वजा करून मोजला जातो. या उदाहरणाद्वारे सोप्या भाषेत समजून घ्या.
एखाद्या संघानं 20 षटकांऐवजी 17.5 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केल्यास, रन रेट 20 षटकांत नव्हे तर 17.5 षटकांत मोजला जातो. मात्र, जर एखादा संघ 20 षटकांपूर्वी ऑलआऊट झाला, तर नेट रन रेट 20 षटकांच्या आधारे मोजला जातो. चेन्नई सुपर किंग्जचं उदाहरण वापरून आम्ही तुम्हाला तपशीलवार समजावून सांगतो.
सध्या 13 सामने खेळल्यानंतर सीएसके गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट +0.528 आहे. हा रन रेट मोजण्यासाठी, स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात काढलेल्या धावा खेळल्या गेलेल्या षटकांनी जोडून भागाव्या लागतात. सीएसकेच्या फलंदाजांनी या हंगामात आतापर्यंत 2333 धावा केल्या आहेत आणि एकूण 254.4 षटके खेळली आहेत. 2333 ला 254.4 ने भागा. यानंतर रन रेट 9.160 एवढा निघेल.
आता चेन्नईनं गोलंदाजीत 254.3 षटकात 2,197 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजेच त्यांचा रन रेट 8.632 आहे. आता जर तुम्ही 9.160 मधून 8.632 वजा केलं तर तुम्हाला 0.528 मिळेल, जो चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा ‘नेट रन रेट’ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीसाठी आता प्लेऑफचा रस्ता अवघड, इंग्लडचे दोन खेळाडू परतले मायदेशी
सलग 5 विजयानंतर अशी आहेत आरसीबीसाठी ‘प्लेऑफ’ची समीकरणं, कोणत्या संघाचा पत्ता होणार कट?
राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! आयपीएल 2024 सोडून जोस बटलर इंग्लंडला रवाना, काय आहे कारण?