आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पर्धेला अलविदा केला आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज जोस बटलरनं सोमवारी आरआर कॅम्पचा निरोप घेतला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे विल जॅक्स आणि रीस टॉपली हे देखील इंग्लंडला परतले आहेत. आरसीबीच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवर एका व्हिडिओद्वारे याची पुष्टी करण्यात आली.
आरसीबीनं एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ ड्रेसिंग रूममध्ये बसलेले आहेत. सर्वांनी जॅक्स आणि टॉपलीसाठी टाळ्या वाजवल्या. यावेळी इंग्लंडच्या या दोन्ही खेळाडूंनी या हंगामातील त्यांच्या आठवणी शब्दांत व्यक्त केल्या. हे दोन्ही खेळाडू रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर विमानानं इंग्लंडला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
जॅक्सनं 2024 मध्ये आरसीबीसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. या हंगामात त्यानं 8 सामन्यात 32.86 च्या सरासरीनं 230 धावा केल्या आहेत. या 8 सामन्यांमध्ये त्यानं एक शतक आणि एक अर्धशतकी खेळीही खेळली. दुसरीकडे, रीस टॉपली या मोसमात 4 सामन्यांत केवळ 4 विकेट घेऊ शकला.
या दोघांसह इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं देखील आयपीएलचा निरोप घेतला आहे. राजस्थान रॉयल्सनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये बटलर हॉटेल सोडताना दिसत आहे. आरआर कॅम्पनं बटलरला निरोप दिला. याशिवाय कोलकाताचा फिल सॉल्ट, पंजाबचा सॅम करन, जॉनी बेअरस्टो आणि चेन्नईचा मोईन अली हे खेळाडू देखील मायदेशी परतले आहेत. तर पंजाब किंग्जचा झंझावाती फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन गुडघ्याच्या दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे.
जूनमध्ये सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाआधी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 22 मे ते 30 मे दरम्यान खेळली जाईल. या मालिकेत जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्षाला किती कमाई करतो शुबमन गिल? टीम इंडियाच्या ‘प्रिंस’ची एकूण संपत्ती किती?
राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! आयपीएल 2024 सोडून जोस बटलर इंग्लंडला रवाना, काय आहे कारण?
ना चेन्नई ना मुंबई; ही आहे आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणारी टीम