भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएल 2024 च्या आधी तब्बल 4 महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. तो डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत रिलायन्स वन टीमची धुरा सांभाळत आहे. हार्दिकच्या मैदानात परतल्याने चाहत्यांचे चेहरे फुलले आहेत. तसेच, हार्दिक पांड्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता. पण आता IPL 2024 च्या आधी हार्दिक पांड्या एका नव्या वादात सापडला आहे. आता त्याच्यावर बीसीसीआयचे नियम मोडल्याचा आरोप केला जात आहे.
याबरोबरच हार्दिक गेल्या 5 महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नाही. तसेच आता आयपीएल 2024 जवळ आल्याने त्याने स्वत:ला फिट दाखवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, आयपीएलपूर्वी तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत खेळत आहे. यावेळी रिलायन्स संघाकडून खेळताना हार्दिक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्याच्यावर बीसीसीआयचा नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हार्दिक पांड्या सध्या डीवाय पाटील स्पर्धेत फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो होता आणि खाली तिरंगा होता. पण बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत बीसीसीआयचा लोगो वापरता येत नाही. हा लोगो तेव्हाच वापरला जातो जेव्हा खेळाडूला बीसीसीआयने निवडलेल्या संघात खेळण्याची संधी मिळते.
तसेच तुम्ही कोणत्याही अंडर 19 देशांतर्गत स्पर्धा, रणजी, सय्यद मुश्ताक किंवा इतर कोठेही बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट वापरू शकत नाही. त्यामुळे आता हार्दिकने हा नियम मोडला असून तो भविष्यात कोणत्या अडचणीत सापडतो, त्याच्यावर कारवाई होते की नाही, हे पाहणे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
Glad to be back doing what I love 🤙 pic.twitter.com/vXlmWANJhs
— hardik pandya (@hardikpandya7) February 26, 2024
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिक पांड्या आता डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. हार्दिक डी वाय पाटील टी-20 कपमध्ये रिलायन्स वन संघाचे नेतृत्व करत आहे. गेल्या आठवड्यात हार्दिकने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर हार्दिकने डीवाय पाटील टी-20 चषकासह आयपीएल 2024 ची तयारी सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : चौथ्या कसोटीवेळी चाहत्यांना लागले विराट कोहलीच्या ‘अकाय’चे वेड, केली पदार्पणाची मागणी
- IND Vs ENG : केएल राहुल पाचवा कसोटी सामना सोडून गेला इंग्लंडला; घ्या जाणून काय आहे प्रकरण