सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सात मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाणार आहे. यादरम्यान केएल राहुल सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे तो उपचारासाठी लंडनला गेले आहे. अशा स्थितीत पाचव्या कसोटी सामन्यातून केएल राहुल बाहेर जाऊ शकतो.
याबरोबरच या मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर राहुलला दुखापतीमुळे मालिकेतील पुढील तीन सामन्यांमधून बाहेर राहावे लागले होते. तसेच क्रिकबझच्या वृत्तानुसार, केएल राहुल उपचारासाठी लंडनला पोहोचला आहे कारण तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे केएल राहुलच्या फिटनेसचे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अधिकाऱ्यांनी तपासनी केल्यानंतर राहुलला उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आले आहे.
मात्र, केएल राहुलच्या पुनरागमनाबाबत बीसीसीआयकडून अजुनही कोणती माहिती देण्यात आलेली नाही. तसेच केएल राहुलची अलीकडची कामगिरीही चांगली राहिली आहे. तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये केएल राहुलने टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली होती. याबरोबरच गेल्या वर्षी पण केएल राहुल त्याच्या उजव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखण्याशी झुंज देत होता, ज्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना तो खेळला होता. परंतु त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तसेच बीसीसीआयने चौथ्या सामन्यापूर्वी एक अपडेट दिले होते की तो पाचव्या सामन्यात पुनरागमन करू शकतो, परंतु सध्या ते अवघड दिसत आहे.
🚨KL Rahul's availability for the final Test in Dharamsala is in doubt
🚨Jasprit Bumrah is likely to return to the squad for the final Test although discussions are still on regarding workload management of players
More details: https://t.co/6WUSd260LV#INDvENG pic.twitter.com/fsD3U8p7Q8
— Cricbuzz (@cricbuzz) February 27, 2024
दरम्यान, या मालिकेत भारतीय संघाची सुरुवात पराभवाने झाली होती. तर पहिल्याच सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव केला होता. पण त्या सामन्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले आणि सलग 3 सामने जिंकून मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : अर्रर्र..! हार्दिक पांड्याने मारला टोमणा, म्हणाला, ‘ तुझ्यात ताकद असेल तर…
- WPL 2024 : स्मृती मंधानाने फोड फोड फोडलं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गुजरातवर दमदार विजय