पंजाब किंग्स संघाकडून धक्कादायक पराभव पाहिलेल्या गुजरात संघासाठी आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात गुजरातकडून डेव्हिड मिलरच्या जागी केन विलियम्सन याला संधी देण्यात आल्याचे सर्वांनी पाहिले. या महत्वाच्या सामन्यात डेव्हिड मिलर खेळला नाही. परंतू आता डेव्हिड मिलरच्या न खेळण्याचे खरे कारण समोर आले आहे. ज्यामुळे गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. ( IPL 2024 Huge Blow To Gujarat Giants As South African David Miller Ruled Out For A Week Or Two )
पहिला डाव संपल्यानंतर केन विल्यम्सनने सांगितले की डेव्हिड मिलर पुढच्या काही सामन्यात खेळू शकणार नाही. केन विल्यम्सनने गुजरातचा डाव संपल्यावर संवाद साधला असता यावर खुलासा केला. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘मैदानात उतरल्यावर चांगले वाटले. डेव्हिड मिलर एक दोन आठवड्यासाठी नसणे ही बाब चिंतेची आहे. डेव्हिड मिलरला दुखापत झाली असून त्यामुळेच त्याला खेळवलं नव्हतं.’ केन विलियम्सनच्या या प्रतिक्रियेतून मिलर हा पुढील काही सामन्यांसाठी उपलब्ध नसणार हे स्पष्ट झाले आहे.
आयपीएल 2022 पासून डेव्हिड मिलर गुजरात टायटन्स संघासाठी खेळतो आहे. यंदा आयपीएल 2024 मध्ये मिलरने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या होत्या. तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 16 चेंडूत 21 धावांची खेळी केली होती.
अधिक वाचा –
– ‘कुणीच बोली लावली नाही अन् पंजाब म्हटलं चुकून घेतलाय’, पंजाब किंग्जच्या शशांक सिंगची आयपीएल स्टोरी आहे एकदम भारी
– मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! संघाचा तारणहार पुन्हा परतणार, सुर्याच्या कमबॅकचा दिवस ठरला?
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ