IPLक्रिकेटखेळाडूटॉप बातम्या

‘कुणीच बोली लावली नाही अन् पंजाब म्हटलं चुकून घेतलाय’, पंजाब किंग्जच्या शशांक सिंगची आयपीएल स्टोरी आहे एकदम भारी

आयपीएल 2024 च्या गुरुवारी (दि. 4) झालेल्या थरारक सामन्यात पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर शानदार विजय मिळवला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरातच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरसः हिरावून घेतला. पंजाबच्या या शानदार विजयात सिंहाचा वाटा उचलला तो शशांक सिंग याने शशांकने नाबाद 61 धावांची अर्धशतकी खेळी करत पंजाबला विजय प्राप्त करून दिला. परंतू यानंतर चर्चा होऊ लागली आहे ती शशांक सिंह नेमका कोण? याचीच. गुजरातला गुजरातच्याच धर्तीवर हरवण्याची किमया करणाऱ्या पंजाब संघाचा हा ‘सिंह’ आयपीएलमध्ये सामील होण्याची स्टोरी देखील रंजक आहे.

शशांक सिंग हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. शशांक सिंग गोलंदाजी देखील करतो. तो एक उत्तम ऑलराऊंडर म्हणून नावारुपाला येत आहे. शशांकने गुरुवारी तुफान फलंदाजी करून पंजाब संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या फलंदाजीमुळे सगळेच अवाक् झालेत. परंतू त्याच्या आयपीएलमध्ये येण्याची स्टोरी वाचून तर तुम्ही आणखीन थक्क व्हाल. कारण कुणीही त्याला आपल्या ताफ्यात घ्यायला तयार नव्हते. ना त्यावर बोली लावत होते. परंतू पंजाबने चुकून त्याला ताफ्यात घेतले होते. ( From mistaken identity to miracle man Shashank Singh puts behind IPL auction controversy to become PBKS hero vs GT )

  • आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंग याला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीने पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्जने शशांक सिंगला संघात घेतले, परंतू काही कारणांमुळे आपण चुकीच्या खेळाडूला संघात घेतल्याचे त्यांना नेहमी वाटत होते. मात्र काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबने शशांक सिंगला संघात घेतल्याचे जाहीर केले. अन् ह्याच शशांक सिंगने पंजाबला काल अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

पंजाब किंग्जकडून गुरुवारी (दि. 4) गुजरातविरुद्ध 61 धावांची खेळी करणाऱ्या शशांक सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. शशांक सिंगने 29 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यात त्याने 210 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्यात. त्यात शशांकच्या 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. शशांक सिंगने यापूर्वी आरसीबी विरुद्धच्या सामन्यातही आपल्या फलंदाजीची चुनूक दाखवून दिली होती. तेव्हा त्याने 8 चेंडूत 21 धावा केल्या होत्या.

अधिक वाचा –
– मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! संघाचा तारणहार पुन्हा परतणार, सुर्याच्या कमबॅकचा दिवस ठरला?
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ
– IPL 2024 GT vs PBKS : टॉस जिंकून पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात घातक खेळाडूंची एन्ट्री, पाहा प्लेइंग इलेव्हन

Related Articles