आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊनं गुजरातवर 33 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सचा संघा 18.5 षटकांत 130 धावांवर ऑलआऊट झाला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनं चांगली सुरुवात केली होती. पॉवरप्लेमध्ये गुजरातनं एक गडी गमावून 54 धावा केल्या होत्या. कर्णधार शुबमन गिल 21 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. केन विल्यमसन एक धाव काढून बाद झाला. साई सुदर्शन 23 चेंडूत 31, शरथ 5 चेंडूत 2 आणि दर्शन नळकांडेनं 11 चेंडूत 12 धावांचं योगदान दिलं. लखनऊकडून यश ठाकूरनं घातक गोलंदाजी करत 5 बळी घेतले. क्रुणाल पांड्यानं 3 जणांना तंबूत पाठवलं.
प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं पहिली विकेट क्विंटन डी कॉकच्या रुपात (6) गमावली. यानंतर देवदत्त पडिक्कलच्या (7) रूपानं त्यांची दुसरी विकेट 18 धावांवर पडली. मात्र कर्णधार केएल राहुलनं 33 आणि मार्कस स्टॉइनिसनं 58 धावा करत डावाला आकार दिला. अखेरीस, आयुष बदोनीनं 11 चेंडूत 20 धावा आणि निकोलस पूरननं 22 चेंडूत 32 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं. गुजरात टायटन्सकडून वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांनी 2-2 बळी घेतले. फिरकीपटू राशिद खानला एक बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेअर्स – मणिमरण सिद्धार्थ, दीपक हुडा, अमित मिश्रा, युद्धवीर सिंग चरक, अर्शद खान
गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कर्मधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – केन विल्यमसन, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, मानव सुथार, जयंत यादव
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहचा किलर यॉर्कर! प्रयत्न करूनही पृथ्वी शॉ काहीच करू शकला नाही; पाहा VIDEO
दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्लेऑफचा रस्ता कठीण, जाणून घ्या ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाची कारणं
अक्षर पटेलचा अशक्यप्राय झेल! इशान किशनचा विश्वासच बसेना; पाहा VIDEO