---Advertisement---

जसप्रीत बुमराहचा किलर यॉर्कर! प्रयत्न करूनही पृथ्वी शॉ काहीच करू शकला नाही; पाहा VIDEO

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जसप्रीत बुमराहनं अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानं पृथ्वी शॉला एका धोकादायक ‘यॉर्कर’वर चारी मुंड्या चित करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पृथ्वी 40 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. बुमराहनं आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये येताच पृथ्वीला आपला बळी बनवलं.

जसप्रीत बुमराह दिल्लीच्या डावात 12व्या षटकामध्ये गोलंदाजीला आला. त्यानं षटकाचा पाचवा चेंडू पृथ्वीच्या पायाजवळ टाकला. हा यॉर्कर इतका वेगवान आणि अचूक होता की पृथ्वीला काहीच सुचलं नाही. तो क्लीन बोल्ड झाला. बुमराहच्या या चेंडूचं सर्वत्र कौतुक होत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

 

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध शानदार फलंदाजी करत होता. या सामन्यात पृथ्वीनं 40 चेंडूंचा सामना करत 66 धावांची खेळी खेळली, ज्यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानं केवळ 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या या हंगामातील पृथ्वीचं हे पहिलंच अर्धशतक होतं.

या सामन्यात बुमराहनं चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 22 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. डावाच्या 15व्या षटकात बुमराहनं अभिषेक पोरेलला बाद केलं.

यासह जसप्रीत बुमराहनं वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला आहे. त्यानं मुंबई इंडियन्सचा गोलंदाज म्हणून एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. बुमराह आयपीएलच्या इतिहासात एकाच संघासाठी 150 बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. त्यानं सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना आयपीएलमध्ये 147 बळी घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला.

जसप्रीत बुमराहचा आयपीएल रेकॉर्ड शानदार आहे. त्यानं 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आयपीएलच्या 124 सामन्यांध्ये बुमराहनं 150 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 23.19 आणि इकॉनॉमी 7.35 एवढी राहिली. 10 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्लेऑफचा रस्ता कठीण, जाणून घ्या ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाची कारणं

अक्षर पटेलचा अशक्यप्राय झेल! इशान किशनचा विश्वासच बसेना; पाहा VIDEO

हार्दिक पांड्यानं अखेर विजयाची चव चाखली! दिल्लीचा 29 धावांनी पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---