आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसते. दव हा फार मोठा फॅक्टर नाही. केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोठा पराभव झाला. तरीही आम्ही निवांत आहोत. आमच्यासोबत उत्तम सपोर्ट स्टाफ आहे. आम्ही शक्य तितक्या आरामात राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या संघात फक्त एक बदल. जोसेफ बाहेर गेला आहे. त्याच्या जागी मॅट हेन्री आला.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड – आम्हीही आधी गोलंदाजी केली असती. शेवटच्या सामन्यात आम्ही प्रथम चांगली फलंदाजी केली. मुंबई विरुद्ध विजय आत्मविश्वास वाढवणारा आहे. तिथे जाऊन धावांचं बचाव करणं हे आमच्यासाठी मोठं प्रोत्साहन आहे. आम्ही शक्य तितकं सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. संघात दोन बदल. मिशेलच्याजागी मोईल अली आणि शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहर.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर
दोन्ही संघांनी या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी चेन्नई 4 विजयानंतर 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊ सुपर जायंट्स 3 विजयानंतर 6 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. शेवटचे दोन सामने सलग हरल्यानंतर लखनऊला त्यांच्या घरच्या मैदानावर आज विजयी मार्गावर परतायचंय. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जला आपली विजयी मालिका कायम ठेवायची आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ आतापर्यंत 3 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी चेन्नईनं 1 तर लखनऊनं 1 सामना जिंकला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पाच संघांवर भारी एकटा ‘हिटमॅन’! पॉवर प्ले मध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस