---Advertisement---

नाणेफेकीचा कौल लखनऊच्या पारड्यात, कोलकाताला फलंदाजीचं निमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग ११

---Advertisement---

आयपीएल २०२४ च्या ५४व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्हाला धावांचा पाठलाग करायला आवडतं. चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही परिस्थितीशी चांगलं आणि त्वरीत जुळवून घेऊ शकलो. तसेच काही जणांकडून चमकदार कामगिरीही झाली आहे. स्ट्राइक-रेटबद्दल बरीच चर्चा झाली आहे आणि टी-20 क्रिकेट गेल्या काही वर्षांत खूप बदललं आहे. मयंक यादवच्या जागी यश ठाकूर आला आहे.

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – आम्हीही गोलंदाजीच केली असती. शेवटच्या सामन्यात पाच गोलंदाजांसह धावांचा बचाव केल्यानं आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही त्याच टीमसोबत जात आहोत. आशा आहे की आम्ही तोच फॉर्म कायम ठेवू.

दोन्ही संघांच्या प्लेइंग ११

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर

इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शिन कुलकर्णी, मणिमरण सिद्धार्थ, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, देवदत्त पडिक्कल

कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड, वैभव अरोरा

आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. लखनऊनं चालू हंगामात आपला दबदबा कायम ठेवत विरोधी संघांना कडवी टक्कर दिली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघानं चालू हंगामात 10 सामने खेळले, ज्यापैकी 6 सामने जिंकले असून 4 गमावले आहेत. गुणतालिकेत हा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्स संघ आयपीएल 2024 मधील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 10 पैकी 7 सामने जिंकले असून संघाला केवळ तीन सामन्यांत पराभव पत्कारावा लागला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ आहे. संघ 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हर्षल पटेलचा खणखणीत ऑर्कर अन् ‘थाला’ पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाबविरुद्ध आल्या पावली परतला महेंद्रसिंह धोनी!

सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘बेबी मलिंगा’ जखमी होऊन आयपीएलमधून बाहेर

३६व्या वर्षी ठोकलं ६३वं शतक! राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारानं निवडकर्त्यांना इंग्लंडमधून दिलं उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---