क्रिकेटटॉप बातम्या

३६व्या वर्षी ठोकलं ६३वं शतक! राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारानं निवडकर्त्यांना इंग्लंडमधून दिलं उत्तर

रेड बॉल क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा सध्या तुफान फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये एकापाठोपाठ एक शतकं झळकावणाऱ्या पुजारानं इंग्लंडमध्येही आपला फॉर्म जारी ठेवला आहे.

चेतेश्वर पुजारानं इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या केवळ तिसऱ्या सामन्यात पहिलं शतक झळकावलं. त्यानं ससेक्सकडून खेळताना डर्बीशायरविरुद्ध शानदार खेळी करत संघाला सामन्यात जिवंत ठेवलं आहे. पहिल्या सामन्यात पुजारानं 38 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्यानं पहिल्या डावात 86 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 44 धावा केल्या. आता तिसऱ्या सामन्यात त्यानं शतक झळकावलं आहे. हे त्याचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 63 वं शतक आहे.

डर्बीशायरविरुद्ध ससेक्सची सुरुवात चांगली झाली नव्हती. परंतु पुजारानं क्रिजवर येत डावाची जबाबदारी स्वीकारली. त्यानं 167 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीनं नाबाद 104 धावांची खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ससेक्सची धावसंख्या 357/5 अशी होती. यासह ससेक्सनं डर्बीशायरविरुद्ध 111 धावांची आघाडी घेतली आहे. संघानं पहिल्या डावात केवळ 246 धावा केल्या होत्या. आता तिसऱ्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा असेल आणि पुजाराकडून संघाला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक द्विशतक झळकावण्याची अपेक्षा असेल.

चेतेश्वर पुजारानं रेड बॉल क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं 267 सामन्यांच्या 441 डावांमध्ये 46 वेळा नाबाद राहताना एकूण 20566 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 352 आहे. तर त्याची सरासरी ५२.०६ आहे. या दरम्यानं त्याच्या बॅटमधून 63 शतकं आणि 80 अर्धशतकं निघाली आहेत. त्याच वेळी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून 2585 चौकार आणि 63 षटकार निघाले आहेत.

चेतेश्वर पुजारानं केवळ बॅटमधूनच नाही तर क्षेत्ररक्षणातूनही संघासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यानं आतापर्यंत आपल्या संघासाठी 160 झेल घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा झटका, ऑलिम्पिक चाचण्यांपूर्वी ‘नाडा’नं केलं निलंबित; जाणून घ्या कारण

ऋतुराज गायकवाडचं नशीबच फुटकं! ११ पैकी १० सामन्यांमध्ये हरला टॉस; लवकरच करणार लाजिरवाणा विक्रम

चीते की चाल, बाज की नजर और विराट कोहली का थ्रो.. शाहरूख खानला तंबूत धाडणारा कोहलीचा रॉकेट थ्रो पाहिलात का? Video

Related Articles