---Advertisement---

चीते की चाल, बाज की नजर और विराट कोहली का थ्रो.. शाहरूख खानला तंबूत धाडणारा कोहलीचा रॉकेट थ्रो पाहिलात का? Video

Virat Kohli Stuns Shahrukh Khan With Superman-Style Run Out
---Advertisement---

आयपीएल 2024 मधील 52वा सामना काल (दि. 4) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात झाला. बंगळुरुने हा सामना 13.4 षटकांत जिंकत गुणतालिकेत थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीने हा सामना एकप्रकारे एक हातीच जिंकला. परंतू त्यामागे बंगळुरुच्या सर्वच खेळाडूंनी चांगले क्रिकेट खेळले. यात अनेक गोष्टी लक्षात राहण्यासारख्या होत्या. परंतू सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट ठरली, ती म्हणजे विराट कोहलीचा रॉकेट थ्रो.

गुजरात विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. त्याने गुजरात टायटन्सचा फलंदाज शाहरुख खानला रॉकेट थ्रोसह धावबाद केले. मोहम्मद सिराज जेव्हा 13 वे षटक टाकत होता, तेव्हा चौथ्या चेंडूवर राहुल तेवतिया स्ट्राइकवर होता. तेवतियाने हा चेंडू मारला पण तिथे धाव होणार नव्हती, परंतू समोर असलेला शाहरूख धावला, परंतू त्याने मागे फिरून सेफ राहण्याआधीच विराट कोहलीने त्याचा जलवा दाखवला. ( Virat Kohli Stuns Shahrukh Khan With Superman-Style Run Out Cameron Green Reaction Viral video )

विराट कोहलीच्या वेगवान थ्रोपासून शाहरूख स्वतःला वाचवू शकला नाही. विराट कोहलीच्या या रॉकेट थ्रोवर कॅमरून ग्रीनची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. त्याने तर तोंडालाच हात लावला होता. हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---