---Advertisement---

ऋतुराज गायकवाडचं नशीबच फुटकं! ११ पैकी १० सामन्यांमध्ये हरला टॉस; लवकरच करणार लाजिरवाणा विक्रम

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या चांगल्या नशीबासाठी ओळखला जायचा. तो कर्णधार असताना त्यानं अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली होती, ज्याचा फायदा संघाला झाला आहे.

मात्र चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड या बाबतीत धोनी इतका लकी नाही. तो आज पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा नाणेफेक हरला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, ऋतुराज गायकवाडनं या आयपीएलमध्ये 11 पैकी 10 सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे! ऋतुराजनं आयपीएल 2024 मध्ये फक्त कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकली होती. या सामन्यात चेन्नईनं 7 गडी राखून विजय मिळवला होता.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं आतापर्यंत या हंगामात 11 पैकी 10 वेळा नाणेफेक गमावली आहे. या १० पैकी संघाला ४ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. हे देखील आश्चर्यकारक आहे की, ऋतुराज आता आयपीएल 2024 मध्ये सलग सहाव्यांदा नाणेफेक हरला आहे!

बरं, ऋतुराज गायकवाड सतत नाणेफेक हरत असला तरी प्रत्येक सामन्यात त्याची वैयक्तिक कामगिरी चांगली होत आहे. रविवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऋतुराजनं आयपीएल 2024 मध्ये 509 धावा केल्या आहेत.

आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे. 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना सॅमसननं 13 वेळा नाणेफेक गमावली होती. तर 2012 मध्ये एमएस धोनीनं 12 वेळा नाणेफेक गमावली होती.

आता ऋतुराज या यादीत अव्वल स्थानी येण्याच्या जवळ आहे. या मोसमात त्यानं आतापर्यंत 10 वेळा नाणेफेक गमावली आहे. लीग टप्प्यात चेन्नईचे अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. तसेच चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचली तरी संघाला आणखी कमीत कमी दोन सामने खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे सर्वाधिक नाणेफेक गमावण्याच्या बाबतीत ऋतुराज संजू सॅमसनच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नईविरुद्ध टॉस जिंकून पंजाबची गोलंदाजी, सॅन्टनरचा प्रथमच संघात समावेश; जाणून घ्या प्लेइंग ११

आरसीबीकडून गुजरातचा दारूण पराभव, ‘इस साला कप नामदे’च्या आशा जिवंत, परंतू निकालानंतर मुंबईला मोठा धक्का !

कोण आहे मानव सुथार? आरसीबीविरुद्ध गुजरात टायटन्ससाठी केलं आयपीएल पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---