IPLक्रिकेटटॉप बातम्या

प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या इराद्यानं उतरणार राजस्थान, लखनऊविरुद्ध टॉस जिंकून गोलंदाजी

आयपीएल 2024च्या 44व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्यासाठी ही चांगली विकेट दिसते. हा हंगाम थोडा वेगळा आहे. आमच्या संघात बदल नाही. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत आणि आम्हाला ते करत राहण्याची गरज आहे.

लखनऊचा कर्णधार केएल राहुल – विकेट चांगली आहे. जास्त दव नाही. संपूर्ण 40 षटके विकेट चांगली खेळेल. आम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आमच्या संघात कोणताही बदल नाही.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर्स – रियान पराग, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर

इम्पॅक्ट प्लेअर्स – अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ

राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या 14 अंकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवताच त्यांचं प्लेऑफ मधील स्थान जवळपास निश्चित होईल.

दुसरीकडे, लखनचा संघ 10 अंकांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 8 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून लखनऊचा संघ गुणतालिकेत आपलं स्थान मजबूत करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुमचं रडगाणं थांबवा….”, प्रत्येक सामन्यात मार खाणाऱ्या गोलंदाजांना असं काय म्हणाले रवी शास्त्री?

पांड्या-बुमराह कोणालाच सोडलं नाही! ‘मॅकगर्क’ नावाच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज पाचोळ्यासारखे उडाले

पृथ्वी शॉचं करिअर धोक्यात? खराब फॉर्ममुळे दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता

Related Articles