IPLक्रिकेटटॉप बातम्या

अन् रिषभ पंत भर मैदानात उडवायला लागला पतंग! पाहा व्हायरल व्हिडिओ

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 257 धावांची मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कनं शानदार फलंदाजी केली. त्यानं 27 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 84 धावा ठोकल्या.

धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला आले. यावेळी मैदानात एक अनोखी घटना घडली. लिझाद विल्यम्स दिल्लीसाठी पहिलं षटक टाकायला आला. याच षटकात मैदानात कुठूनतरी एक पतंग उडून आला. यानंतर मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पतंगाला मैदानाबाहेर नेण्यापूर्वी रिषभ पंतनं तो हवेत उडवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूनंतर घडली.

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रथम रोहित शर्मानं पतंग उचलून रिषभ पंतच्या हातात दिला. अंपायरला पतंग देण्यापूर्वी पंतनं त्याला थोडं उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका चाहत्यानं गंमतीत म्हटलं की, रिषभ पंतला मैदानात पतंग उडवल्याबद्दल दंड ठोठावला पाहिजे. तर काही लोकांनी रोहित शर्मा आणि रिषभ पंतच्या या क्षणाला फारच गमतीशीर म्हटलं आहे.

 

दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 गडी गमावून 257 धावा केल्या. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलमधील यापूर्वी दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या 231 होती, जी त्यांनी 2011 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध रचली होती.

आजच्या सामन्यात जेक फ्रेझर मॅकगर्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावू शकला नाही. तो 27 चेंडूत 84 धावा धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स –  रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

इम्पॅक्ट प्लेअर्स – सूर्यकुमार यादव, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय

दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद

इम्पॅक्ट प्लेअर्स – रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुमचं रडगाणं थांबवा….”, प्रत्येक सामन्यात मार खाणाऱ्या गोलंदाजांना असं काय म्हणाले रवी शास्त्री?

पांड्या-बुमराह कोणालाच सोडलं नाही! ‘मॅकगर्क’ नावाच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज पाचोळ्यासारखे उडाले

पृथ्वी शॉचं करिअर धोक्यात? खराब फॉर्ममुळे दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता

Related Articles