आयपीएलमध्ये अनेक नवे नियम येत असतात. आता बीसीसीआय आणखी एका नियमाची भर टाकणार आहे. या नियमाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. आयपीएलमध्ये जितक्या कमकुवत टीम आहेत, त्यांच्यासाठी अजून परिस्थिती अवघड होणार आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमला अधिक अवघड परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. बंगळुरू आयपीएलमधील कमकुवत टीम यासाठी मानली जाते कारण त्यांनी आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही. या नियमामुळे आरसीबीसारख्या जितक्या कमकुवत टीम आहेत, त्यांच्यासाठी आयपीएल ट्रॉफीच्या रेसमध्ये अडथळे वाढणार आहेत. दुसरीकडे, जितके मजबूत संघ आहेत ते सर्व संघ अधिक मजबूत होणार आहे. जाणून घेऊया काय आहे हा नियम.
काय आहे आयपीएलचा नवीन नियम
बीसीसीआय आयपीएलमधील सर्व संघ व्यवस्थाकांसोबत बैठक घेणार आहे. ही बैठक 16 एप्रिलला अहमदाबाद येथे होणार होती, परंतु काही कारणास्तव या बैठकीला स्थगिती दिली आहे. लवकरच बैठकीची तारीख सांगितली जाईल. मात्र बैठक होण्याआधीच एका नियमाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. जर बीसीसीआयनं हा नियम लागू केला तर काही फ्रेन्चायझींची अडचण होऊ शकते.
एका रिपोर्टनुसार असं समोर येत आहे की, अनेक फ्रेन्चायझी लिलावात 8 खेळाडूंना रिटेन करण्याचा नियम आणायला हवा, अशी मागणी करत आहेत. आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, बीसीसीआय ही मागणी मान्य करु शकते.
कमकुवत संघांचे कसे होणार नुकसान
या नियमानुसार, आयपीएलच्या आगामी (2025) लिलावात चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स यासारखे मजबूत संघ आपल्या 8 खेळाडूंना रिटेन करु शकतात. या संघांकडे आपले मोठे खेळाडू टीममध्ये कायम ठेवण्याची संधी असणार आहे. यामुळे मजबूत संघ अधिक मजबूत होऊ शकतात. जर हा नियम लागू झाला तर कमकुवत संघांना चांगले खेळाडू मिळणार नाहीत. आता पाहावे लागणार आहे की, बीसीसीआय हा नियम लागू करणार का नाही.
महत्त्वाच्या बातम्या