---Advertisement---

IPL 2024 MI : रोहित शर्माची रितिकाच्या ‘त्या’ कमेंट्सनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024)  हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. तर सर्व संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयारीला लागताना दिसत आहे. याबरोबरच खेळाडूंनी देखील सरावाला सुरुवात केली आहे. अशातच मुंबई इंडियन्समधील वाद चव्हाट्यावर असलेला पहायला मिळत आहे. इतकंच काय तर रोहित शर्माकडील कर्णधारपद मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे सोपवलं होतं. व्यवस्थापनाच्या या निर्णयाने फॅन्सनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाउचर या घडामोडीवर स्पष्टीकरण दिलं होतं. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण त्या मुलाखतीवर रितिका सजदेहने प्रतिक्रिया देताच वादळ उठलं होतं. यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्यासाठी कायम उभी राहणारी रितिका.’ या कमेंट्सचा थेट संबंध फॅन्स रितिकाने बाउचरला केलेल्या कमेंट्सशी जोडत आहेत. फॅन्सच्या मते, रोहित शर्माने रितिकाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तसेच रोहित आणि रितिका फोटोमध्ये एका हॉटेलमध्ये एकत्र जाताना पहायला मिळत आहेत.

तर, दुसरीकडे, रोहित शर्मा यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयपीएल 2024 स्पर्धेत रोहित शर्मा नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. कारण आयपीएल ट्रेड विंडो अजूनही सुरू आहे. याचा अर्थ खेळाडूंची आदलाबदल करण्याची अजूनही संधी आहे.

दरम्यान, आयपीएल 22 मार्चपासून सुरू होत असेल, तर ट्रेड विंडो 22 फेब्रुवारीला बंद होईल. यानंतर, खेळाडूंचे हस्तांतरण किंवा विक्री करता येणार नाही. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत ट्रेड झाली तरच हिटमॅन दुसऱ्या संघासाठी खेळू शकेल. ट्रेड विंडोचा पर्याय फक्त फ्रँचायझीसाठी आहे. म्हणजेच रोहित शर्मा स्वतः या पर्यायाचा लाभ घेऊ शकत नाही. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्माला ट्रान्सफर किंवा विकले पाहिजे. अन्यथा, रोहित शर्माला खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळावे लागेल. यामुळे आता पुढील दोन आठवड्यांत मुंबई इंडियन्स काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्वाच्या बातम्या –

IND vs AUS FINAL : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना कुठे आणि केव्हा पाहता येणार; वाचा सविस्तर

दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत जीएसटी जायंटस, रेल्वे वॉरियर्स संघांची आगेकूच 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---