आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी (11 एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं आरसीबीचा दारूण पराभव केला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीची विविध खेळाडूंसोबत चांगली बाँडिंग पाहायला मिळाली. सामन्यानंतर कोहली आणि रोहितचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहेत. यादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय गंभीर वाटत होते. या दोघांच्या एकत्र फोटोवरून सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. काही लोकांचं म्हणणे आहे की, दोघंही आगामी टी-20 वर्ल्ड कपबद्दल चर्चा करत आहेत. त्याचवेळी दोघं सामन्याबाबत चर्चा करत असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
येत्या जून मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. निवडकर्ते आयपीएल सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत. येथे चांगली कामगिरी करणारे खेळाडू टीम इंडियात आपलं स्थान पक्क करू शकतात. अशा परिस्थितीत मुंबई आणि बंगळुरू सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोहली आणि रोहितची भेट हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही.
आयपीएलच्या या हंगामात अनेक युवा खेळाडू आपल्या कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यापैकी काहींना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर ते वावगं ठरणार नाही.
Virat Kohli with Rohit Sharma in the dressing room. ⭐ pic.twitter.com/tms494pYAV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2024
उल्लेखनीय म्हणजे, या सामन्यादरम्यान विराट कोहली बॅटनं काही खास कामगिरी करू शकला नाही, तरी त्याची खिलाडूवृत्ती चर्चेत राहिली. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी आला तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा हूटिंग करण्यास सुरुवात केली. यावर कोहलीनं प्रेक्षकांकडे बोट दाखवत त्यांना असं न करण्यास सांगितलं. हार्दिक हा केवळ मुंबईचाच नाही तर टीम इंडियाचाही खेळाडू आहे, असं त्यानं उपस्थितांना हावभावाद्वारे सांगितलं. त्याचवेळी सामना संपल्यानंतर कोहलीनं हार्दिकला मिठी मारली. विराट कोहलीच्या या वर्तवणूकीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO
एकाच डावात तिघांची अर्धशतकं अन् तिघे शून्यावर बाद! आरसीबी पराभवातही रेकॉर्ड बनवते
“नाहीतर मी कॅनडाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता”, जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा