---Advertisement---

MI vs RCB : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम बॉलिंग करणार, दोन्ही संघांमध्ये मोठे बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

MI-vs-RCB
---Advertisement---

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघात आज (दि. 11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. आयपीएल 2024 मधला हा 25वा सामना असून दोन्ही संघांनी आतापर्यंत फक्त प्रत्येकी 1-1 विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी आणि स्पर्धेतील आपले स्थान बळकट करण्यासाठी दोन्ही संघात आज कांटे की टक्कर पाहायला मिळेल. अशा या महत्वाचा सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला असून प्रथम बॉलिंग अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि बंगळुरु या दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. तसेच यंदा स्पर्धेत या दोन्ही संघांनी अद्याप हवी तशी लय पकडलेली दिसत नाहीये. त्यामुळे आजच्या महत्वाच्या सामन्यात दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हन बदलली आहे. आरसीबीकडून विल जॅक्स याने आज पदार्पन केले आहे. ( IPL 2024 MIVsRCB Mumbai Indians Won Toss Elect Bowl First Against Royal Challengers Bangalore )

पाहा दोन्ही संघांची अंतिम प्लेइंग इलेव्हन-
मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएट्झ, आकाश मधवाल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेइंग इलेव्हन – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, रीस टोप्ली, विजयकुमार वैश्याक, मोहम्मद सिराज, आकाश दीप

अधिक वाचा –
– ब्रेकिंग! RCB सोबतच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल, ‘या’ वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची संघात एन्ट्री । IPL 2024
– मोठी बातमी! आयपीएल दरम्यान हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, भावानेच केली भावाची फसवणूक
– सामना एक पण रेकॉर्ड अनेक! शुबमन गिलची बॅट तळपली आणि विक्रमांचा पडला पाऊस, एका क्लिकवर वाचा त्याचे नवे रेकॉर्ड्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---