---Advertisement---

मुंबईच्या कॅम्पमध्ये ‘बूम-बूम’ दाखल! चाहते म्हणाले, “हार्दिकला बाउन्सर मारून…”

---Advertisement---

आज, 22 मार्चपासून आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होत आहे. पहिला सामना गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

आयपीएलपूर्वी सर्व संघांचे खेळाडू आपापल्या टीमसोबत सराव करत आहेत. काल रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे एकत्र सराव करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याशिवाय काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणारा विराट कोहली देखील बंगळुरूत संघाबरोबर सराव करताना दिसला होता.

आज मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये संघासोबत सामील झाला. बुमराह नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. मात्र तो मालिकेचे सर्व सामने खेळला नाही. वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून त्याला अखेरच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. आज तो अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

मुंबई इंडियन्सनं जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘गर्जना करण्यासाठी तयार!’ बुमराहच्या या पोस्टवर मुंबईचे चाहते मोठ्या संख्येनं कमेंट करत आहेत. मात्र काही चाहत्यांनी यावेळी विचित्र मागणी केली. बुमराहनं मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला बाउन्सरनं जखमी करावं, अशी मागणी चाहते करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

 

मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. संघानं 5 वेळचा चॅम्पियन रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावून घेतलं. मात्र संघाच्या या निर्णयावर टीमचे अनेक चाहते आणि काही खेळाडू देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत.

आयपीएल 2024 मध्ये मुंबईच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. त्याचा आयपीएलचा रेकॉर्ड शानदार आहे. बुमराहनं 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून खेळलेल्या 120 सामन्यांमध्ये त्याच्या नावे 145 विकेट्स आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 23.31 आणि इकॉनॉमी रेट 7.4 एवढा राहिला. 10 धावांमध्ये 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 मधून आतापर्यंत 13 खेळाडू बाहेर, अनेक दिग्गज नावांचाही समावेश, एका क्लिकवर वाचा संपूर्ण लिस्ट

पुण्यात आलिशान घर अन् अप्रतिम कार कलेक्शन, जाणून घ्या ऋतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती?

“डोळ्यात अश्रू अन् सर्व काही थांबलं होतं…”, धोनीनं कर्णधारपद सोडलं तेव्हा चेन्नईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं होतं?

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---