आयपीएल 2024 चा 29 वा सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
या सामन्यात चेन्नईनं एक प्रयोग करून पाहिला. टीमनं अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला सलामीवीर म्हणून पाठवलं. मात्र हा प्रयोग त्यांच्यावरच उलटला. अजिंक्य रहाणे या सामन्यात रचिन रवींद्रसोबत सलामीला आला. रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. मात्र तो आज त्याच्या घरच्या मैदानावर आपला प्रभाव पाडू शकला नाही.
रहाणेनं मुंबईविरुद्ध 8 चेंडूत केवळ 5 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून एक चौकार निघाला. त्याला दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीनं पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रहाणेला चेंडू षटकाराला मारायचा होता, मात्र तो चेंडू योग्य रितीनं टाईम करू शकला नाही. चेंडू हवेत गेला आणि मिडऑनला हार्दिक पांड्यानं सोपा झेल घेतला. रहाणे बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कोएत्झीच्या आनंदाला पारावार नव्हता.
या हंगामात आजच्या सामन्यापूर्वी रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून आले होते. मात्र वानखेडेवर गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. गायकवाडची टी-20 कारकिर्दीतील ही सहावी आणि आयपीएलमधील तिसरी वेळ आहे, जेव्हा तो सलामीला आला नाही. त्यानं 2020 मध्ये राजस्थानविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात तो पाचव्या आणि दिल्लीविरुद्धच्या पुढच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
आयपीएलच्या या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्यानं 6 सामन्यांच्या 5 डावांत फलंदाजी करताना 124 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 24.80 आणि स्ट्राइक रेट 125.25 एवढा राहिला. 45 ही त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’! लखनऊविरुद्धचा अप्रतिम झेल पाहून ‘किंग खान’ही स्तब्ध; पाहा VIDEO
फिल सॉल्टची तुफानी खेळी, कोलकाताचा लखनऊवर शानदार विजय; मिशेल स्टार्कनं घेतल्या 3 विकेट
लखनऊचे करोडो रुपये पाण्यात! दीपक हुडा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप