इंडियन प्रीमियर लीगच्या ‘एल क्लासिको’मध्ये मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं. चेन्नईची सुरुवात काही खास झाली नाही. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र रचिन जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. यानंतर गायकवाड आणि शिवम दुबे यांची जोडी जमली. या दोघांनी मिळून धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. त्यांनी वेगानं फटकेबाजी सुरू ठेवली. या दरम्यान ऋतुराज गायकवाडला एक जीवदान मिळालं. रोहित शर्मानं त्याचा झेल सोडला.
चेन्नईच्या डावातील 12 व्या षटकात आकाश मधवाल गोलंदाजीला आला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ऋतुराजनं मिडविकेटवर शानदार शॉट मारला. चेंडू हवेत होता आणि रोहित त्याच्या मागे धावता होता. रोहितनं झेल पकडण्यासाठी डाइव्ह मारली. त्याचा हात चेंडूखाली आला, मात्र त्याला आपला तोल सांभाळता आला नाही आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला. हा झेल पकडण्यासाठी रोहितनं एवढ्या जोरात प्रयत्न केला की त्यामुळे त्याची पॅन्टच निसटली.
Now we know why Rohit and his fans have problems with Rohit fielding at boundary 😭#MIvCSK #RohitSharma pic.twitter.com/vVaUpCpIqt
— ^ (@Viratx82_) April 14, 2024
ऋतुराज गायकवाडला रोहित शर्माकडून जीवदान मिळालं. या जीवदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उचलला. ऋतुराज 40 चेंडूत 69 धावांची खेळी करून बाद झाला. या खेळीत त्यानं 5 षटकार आणि तेवढेच चौकार मारले. या दरम्यान त्याला शिवम दुबेचीही उत्तम साथ मिळाली. शिवम दुबेनं स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 28 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
मुंबईविरुद्धच्या या सामन्यात सीएसकेनं शानदार फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांत 207 धावा बनवल्या. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आला. धोनीनं शेवटच्या षटकात सलग तीन षटकार लगावले. त्यानं अवघ्या 4 चेंडूत 20 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर सीएसकेनं मुंबईसमोर 207 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईचा प्रयोग त्यांच्यावरच उलटला! घरच्या मैदानावर सलामीला आलेला रहाणे पूर्णपणे फ्लॉप
रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’! लखनऊविरुद्धचा अप्रतिम झेल पाहून ‘किंग खान’ही स्तब्ध; पाहा VIDEO
फिल सॉल्टची तुफानी खेळी, कोलकाताचा लखनऊवर शानदार विजय; मिशेल स्टार्कनं घेतल्या 3 विकेट