---Advertisement---

‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!

---Advertisement---

वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचा जुना अवतार पाहायला मिळाला. ‘थाला’नं शेवटच्या षटकात फलंदाजीला येऊन हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग 3 षटकार ठोकले. धोनी 4 चेंडूत 20 धावा करून नाबाद परतला. हार्दिक पांड्याच्या या शेवटच्या षटकात 26 धावा निघाल्या. धोनी जेव्हा षटकार मारत होता तेव्हा वानखेडे स्टेडियमवरील चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

मुंबई विरुद्ध धोनी शेवटच्या षटकात फलंदाजीला उतरला. त्यानं 500 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या माहीनं 4 चेंडूत 3 षटकार मारत 20 धावा केल्या. हार्दिक पांड्या मुंबईसाठी शेवटचं षटक टाकत होता. दुसऱ्या चेंडूवर त्याला डॅरेल मिशेलची विकेट मिळाली. यानंतर धोनीने येऊन सलग तीन चेंडूंवर तीन षटकार मारत हार्दिक पांड्याची लाईन-लेन्थ बिघडवून टाकली.

 

धोनीच्या या खेळीचं कौतुक आता जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू करत आहेत. अफगाणिस्तानचा क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या राशिद खाननं ‘X’ वर लिहिलं, “MSD-finisher”. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं लिहिलं की, “धोनीनं ज्या प्रकारे एकामागून एक तीन षटकार मारले, तो एक अद्भुत अनुभव होता.” माजी भारतीय फलंदाज मोहम्मद कैफनं ‘X’ वर लिहिलं, “मुंबईचा बादशाह कोण? एमएस धोनी!”

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 40 चेंडूत सर्वाधिक 69 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय शिवम दुबे 38 चेंडूत 66 धावा करून नाबाद परतला. शिवम दुबेनं आपल्या झंझावाती खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, हार्दिक पांड्या हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं चेन्नईच्या 2 फलंदाजांना तंबूत पाठवलं. याशिवाय गेराल्ड कोएत्झी आणि श्रेयस गोपाल यांनी 1-1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

कॅच घ्यायला गेला अन् पॅन्टच निसटली! वानखेडेच्या मैदानावर रोहित शर्माची फजिती; पाहा VIDEO

चेन्नईचा प्रयोग त्यांच्यावरच उलटला! घरच्या मैदानावर सलामीला आलेला रहाणे पूर्णपणे फ्लॉप

रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’! लखनऊविरुद्धचा अप्रतिम झेल पाहून ‘किंग खान’ही स्तब्ध; पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---