आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात आज (7 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसत आहे. आपण वानखेडेवर कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. आम्हाला एक संघ म्हणून एकत्र राहावं लागेल. मला परत आल्याचा आनंद आहे. गोलंदाजी हा एक विभाग आहे जिथे आम्ही सुधार करण्याचा प्रयत्न करू. आमच्या संघात दोन बदल आहेत.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्ही देखील प्रथम गोलंदाजी केली असती. परंतु प्रथम फलंदाजी करण्यात देखील समस्या नाही. ही विकेट थोडी कोरडी दिसते. रात्रीच्या खेळाप्रमाणे चेंडू नीट येत नाही. पण कमी स्विंग असेल आणि फलंदाजी चांगली असेल. आम्हाला स्वत:वर दबाव आणायचा नाही, परंतु एक विजय आम्हाला खूप आत्मविश्वास देईल. आमच्या संघात तीन बदल – सूर्या (सूर्यकुमार यादव) नमनच्या जागी आला आहे. मफाफाच्या जागी रोमारियो आणि ब्रेव्हिसच्या जागी नबी आलाय.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – कुमार कुशाग्र, यश धूल, फ्रेझर-मॅकगुर्क, सुमित कुमार, प्रवीण दुबे
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेअर्स – आकाश मधवाल, क्वेना मफाका, नमन धीर, नेहाल वढेरा, शम्स मुलानी
सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सची स्थितीही फारशी चांगली नाही. संघानं चार पैकी तीन सामने गमावले आहेत. दोन्ही संघांना स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आज विजय मिळवणं गरजेचं आहे. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत हार्दिकसाठी खेळाडू आणि कर्णधार म्हणून काहीही चांगलं राहिलेलं नाही. सोशल मीडिया तसेच मैदानावर त्याला सतत ट्रोल केलं जातय. त्यामुळे आपल्या कामगिरीनं टीकाकारांची तोंड बंद करण्याची त्याच्याकडे ही चांगली संधी असेल.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हेड टू हेड बद्दल बोलायचं झालं तर, या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत. यापैकी मुंबईनं 18 आणि दिल्लीनं 15 सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
देशासाठी खेळताना हिरो, आयपीएलमध्ये मात्र झिरो! ग्लेन मॅक्सवेलला झालंय तरी काय?
विराट कोहलीच्या शतकावर भारी जोस बटलरचं शतक! राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवर शानदार विजय
‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!