आयपीएल 2024 च्या 14व्या सामन्यात आज (1 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. विकेट नवीन दिसते. इथे या हंगामातील पहिला गेम आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. संदीप शर्मा फिट नाही. त्याच्या जागी बर्गर संघात येतोय.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्हीही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचारात होतो. या सामन्याचा एक भाग बनणं खूप रोमांचक आहे. आम्ही क्रिकेटचा वेगळा ब्रँड खेळण्यास उत्सुक आहोत. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 –
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
इम्पॅक्ट प्लेअर्स – डेवाल्ड ब्रेव्हिस, नुवान तुषारा, रोमॅरियो शेफर्ड, नेहाल वढेरा, शम्स मुलानी
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात प्रथमच आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. मुंबईची या हंगामाची सुरुवात चांगली राहिलेली नाही. ते हंगामातील आपल्या पहिला विजयाच्या शोधात आहेत. पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरात टायटन्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव झाला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं त्यांचा 31 धावांनी पराभव केला.
दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ आज विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न करेल. राजस्थाननं पहिल्या सामन्याच लखनऊ सुपर जायंट्सचा 20 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला होता. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आज आपला 200 वा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड बद्दल बोलायचं झालं तर, हे दोन संघ एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी मुंबईनं 15 तर राजस्थाननं 12 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
आयपीएलच्या चीअरलीडर्सचा पगार किती असतो? एका सामन्यासाठी किती मानधन मिळतं? जाणून घ्या