---Advertisement---

IPL 2024 : नवीन कर्णधार, अन् प्रमुख खेळाडूंना दुखापत, पाहा गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11

Gujarat-Titans
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. स्पर्धेपूर्वीच मोहम्मद शमी दुखपतीमुळे बाहेर पडला. त्यात आणखी खेळाडू बाहेर गेल्याने टेन्शन वाढलं आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 24 मार्चला होणार आहे. याआधी युवा कर्णधार शुभमन गिल समोर प्लेइंग 11 बाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच गुजरात टायटन्सच्या संघाने मागील दोन हंगामात हार्दिक पांड्या कर्णधार असताना जबरदस्त कामगिरी केली होती. 

याबरोबरच आयपीएल स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ट्रेड विंडो आणि मिनी लिलावत खेळाडूंची देवाणघेवाण झाली आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला घेतलं होतं. त्यामुळे हार्दिक पांड्या गेल्यानंतर गुजरात टायटन्सने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या हाती सोपवण्यात आली आहे.

अशातच गुजरात टायटन्सच्या संघात शुभमन गिल  राशिद खान, डेव्हिड मिलर, स्पेन्सर जॉन्सन असे अनेक मोठे खेळाडू आहेत. यामुळे गुजरात टायटन्सला हार्दिक पांड्याची कमी भासणार नाही. तसेच गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा संघाला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना आशिष नेहरा याने हार्दिक पांडयाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष नेहराने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “मी कधीच हार्दिक पांड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या पद्धतीने हा खेळ पुढे जात आहे. तर पुढे जाऊन आणखीन ट्रान्सफर बघायला मिळतील. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय क्लबमध्ये असं होतं.” यानंतर आशिष नेहराने शुबमन गिलवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. “गिलला कर्णधार म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. मीच नाही तर संपूर्ण भारत त्याला कर्णधारपद भूषविताना पाहू इच्छित आहे.”

मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यासाठी गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11 – शुभमन गिल(कर्णधार),रिद्दिमन साहा(विकेटकीपर),केन विल्यमसन,साई सुदर्शन, राशिद खान,राहुल तेवतिया,शाहरुख खान,उमेश यादव,मोहित शर्मा,डेव्हिड मिलर, स्पेन्सर जॉन्सन.

आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी गुजरात टायटन्सचा संघ पुढीलप्रमाणे –मॅथ्यू वेड,रिद्दिमन साहा,  शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, केन विल्यमसन, साई सुदर्शन, राशिद खान , राहुल तेवतिया, जयंत यादव, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, दर्शन नळकांडे, शाहरुख खान,  उमेश यादव, जोश लिटल , आर. साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---