मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला शिवम दुबेच्या रूपाने पाचवा धक्का बसला, जो धावबाद झाला. त्याआधी सूर्यकुमार यादवच्या रूपाने चौथा धक्का बसला होता; सूर्या ११ धावा करून बाद झाला. त्यांच्यापूर्वी संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली. संजूने इशानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९७ आणि शिवमसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. इशान ३९, तर अभिषेक ९ धावा करून बाद झाले. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया या सामन्यात कोणताही बदल न करता मैदानात उतरली आहे, तर इंग्लंडने संघात एक बदल केला आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल.
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम कुरेन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.






