आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तसेच पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहेत. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 24 मार्चला आमनेसामने येणार आहेत. तर याआधी ट्रेड विंडो आणि मिनी लिलावत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सची देवाण घेवाण झाली होती. त्यावेळी ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला घेतलं होतं.
यानंतर गुजरात टायटन्सने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या हाती सोपवली आहे. तर गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा संघाला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना आशिष नेहरा याने हार्दिक पांडयाबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आशिष नेहराने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “मी कधीच हार्दिक पांड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या पद्धतीने हा खेळ पुढे जात आहे. तर पुढे जाऊन आणखीन ट्रान्सफर बघायला मिळतील. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय क्लबमध्ये असं होतं.” तसेच पुढे बोलताना आशिष नेहराने शुबमन गिलवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. “गिलला कर्णधार म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. मीच नाही तर संपूर्ण भारत त्याला कर्णधारपद भूषविताना पाहू इच्छित आहे.”
“एक खेळाडू म्हणून शुबमन गिलने आतापर्यंत बरंच काही मिळवलं आहे. आता कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे. कर्णधार म्हणून त्याला बरंच काही मिळवायचं आहे.”, असं आशिष नेहरा याने सांगितलं आहे.
I never tried to convince Hardik to stay back. The way this sport is moving, we will see more such transfers like it happens in soccer's international club market: GT coach Ashish Nehra #IPL2024 pic.twitter.com/XAzAsskS0b
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2024
दरम्यान,IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्स प्रथमच स्पर्धेत सहभाग झाला होता. तर त्यावेळी त्यांनी पहिल्याचं हंगामात चांगली कामगिरी केली होती. मात्र आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. स्पर्धेपूर्वीच मोहम्मद शमी दुखपतीमुळे बाहेर पडला आहे. यानंतर अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे स्टार खेळाडूंच्या अनुपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर संघाचे कर्णधारपद स्वीकारणारा युवा खेळाडू शुबमन गिल संघाचे नेतृत्व कसे करणार हे बघावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- गुजरात टायटन्सला स्पर्धेपूर्वी मोठा धक्का, आयपीएलच्या 17व्या हंगामातून पहिला आदिवासी खेळाडू अपघातामुळे बाहेर
- WPL 2024 Final : आरसीबी इतिहास रचणार की दिल्लीचे स्वप्न भंगणार? घ्या जाणून आकडेवारी आणि प्लेइंग 11