आगामी आयपीएलच्या हंगामासाठी 10 संघानी तयारी सुरु केली आहे. यावेळी आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व असून विजेतेपदासाठी 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. याआधी पंजाब किंग्सने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. पंजाबने आयपीएल 2024 साठी आपली नवीन जर्सी जाहीर केली आहे.
याबरोबरच, टीमची नवीन जर्सी पाहण्यासाठी करोडो चाहते खूप दिवसांपासून उत्सुक होते. तर यावेळी अभिनेत्री प्रीती झिंटा देखील न्यू जर्सी रिव्हल कार्यक्रमात उपस्थित होती. अशातच आयपीएल 2024 ची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. तर पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.
बीसीसीआयने आयपीएलच्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 22 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक समोर आलं आहे. यात एकूण 21 सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे पुढचं वेळापत्रक राज्यातील निवडणुका आणि इतर बाबी डोळ्यासमोर आखलं जाईल यात शंका नाही. आयपीएल स्पर्धा 21 मेपर्यंत असू शकते. गेल्या वर्षी साखळी फेरी, प्लेऑफ आणि अंतिम फेरी पकडून एकूण 74 सामने झाले होते.
अशातच आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. स्पर्धेपूर्वीच मोहम्मद शमी दुखपतीमुळे बाहेर पडला. त्यात आणखी खेळाडू बाहेर गेल्याने टेन्शन वाढलं आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 24 मार्चला होणार आहे.
Sadde Shers ❤️ Saddi Navi Jersey! ❤️🔥#SherSquad, how much do you love our new kit on a scale of 😍 to 🔥?#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi pic.twitter.com/fIi0FNulXC
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 16, 2024
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलचं उर्वरित शेड्युल हे पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. आता ही स्पर्धा विदेशात हलवणे शक्य नाही. युएई हा चांगला पर्याय दिसत असला तरी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील तेथील वातावरण हे खूपच आव्हानात्मक असतं. उष्णतेमुळे खेळाडूंना प्रचंड त्रास होऊ शकतो. तसेच पुढे टी 20 वर्ल्डकप असल्याने खेळाडू फिटनेसच्या बाबतीत जास्त सतर्क असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –