इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या सामन्यापूर्वी रंगारंग उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. या उद्घाटन सोहळ्याला अनेक स्टार्स उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा 30 मिनिटं चालणार असल्याचं सांगण्यात येतंय.
आयपीएल 2024 च्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ उपस्थित राहणार आहेत. या दोन अभिनेत्यांचा नवा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि टायगर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र परफॉर्म करताना दिसणार आहेत.
या दोघांशिवाय प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान आणि गायक सोनू निगम हे देखील या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. एमए चिदंबरम स्टेडियममध्ये त्यांची संगीतमय जुगलबंदी उपस्थित प्रेक्षकांना नक्कीच मोहिनी घालेल. हे सर्व सिनेस्टार स्टेडियममध्ये उपस्थित हजारो प्रेक्षकांसाठी परफॉर्म करण्यासाठी पूर्णपणे तयार असतील. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी स्टेडियमचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोजमध्ये मैदानात रंगीबेरंगी दिवे लावण्यात आल्याचं दिसतंय.
साधारणत: आयपीएल 2024 चा सामना सुरू होण्याची वेळ संध्याकाळी 7:30 वाजताची आहे. मात्र ज्या दिवशी दोन सामने असतील, त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3:30 वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ होणार असल्यानं, सीएसके विरुद्ध आरसीबी सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.
रेकॉर्डवर नजर टाकली तर, या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले. यापैकी चेन्नईनं 20 तर बंगळुरूनं 10 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नईचं नेतृत्व करताना दिसेल. तर बंगळुरूची कमान दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसच्या हाती आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव पहिला सामना खेळला नाही तर कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11? जाणून घ्या
CSK vs RCB सामन्याची तिकिटं कशी खरेदी करायची? तिकिटांची किंमत किती? जाणून घ्या सर्वकाही
IPL 2024चे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? घ्या जाणून सविस्तर