आयपीएल 2024 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतीत काही बदल घडून आले. या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उडी घेतली आहे. केएल राहुलनं 55 धावांची खेळी करत या हंगामात 500 धावांचा टप्पा पार केला. तर रोहित शर्मानं 68 धावा ठोकत 400 धावा पूर्ण केल्या.
सर्वप्रथम, जर आपण ऑरेंज कॅपबद्दल बोललो तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली 661 धावांसह अव्वल स्थानावर आहे. या हंगामात 600 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आज आरसीबी विरुद्ध सीएसके सामना आहे. या सामन्यात कोहलीच्या नजरा 700 धावांचा टप्पा पार करण्यावर असतील. त्याच्याशिवाय ऋतुराज गायकवाड, ट्रॅव्हिस हेड, रियान पराग आणि साई सुदर्शन हे टॉप 5 मध्ये आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल 14 सामन्यांत 37.14 च्या सरासरीनं 520 धावा करून 6व्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मानं या हंगामात 14 सामन्यांमध्ये 32.08 च्या सरासरीनं 417 धावा केल्या असून तो 13 व्या स्थानावर आहे.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 13 सामने 661 धावा
ऋतुराज गायकवाड – 13 सामने 583 धावा
ट्रॅव्हिस हेड – 11 सामने 533 धावा
रियान पराग – 13 सामने 531 धावा
साई सुदर्शन – 12 सामने 527 धावा
पर्पल कॅपबद्दल बोलायचं झालं तर, जसप्रीत बुमराह वगळता मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा एकही गोलंदाज टॉप 15 मध्ये नाही. एलएसजीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातून बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेल 22 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
हर्षल पटेल – 13 सामने 22 विकेट
जसप्रीत बुमराह – 13 सामने 20 विकेट
वरुण चक्रवर्ती – 12 सामने 18 विकेट
युजवेंद्र चहल – 13 सामने 17 विकेट
खलील अहमद – 13 सामने 17 विकेट
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं केलं निलंबित! रोहितसह मुंबई इंडियन्सच्या इतर खेळाडूंनाही दंड
निकोलस पूरननं धो-धो धुतलं! मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी मोठं लक्ष्य