---Advertisement---

आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, तिकीट कसं खरेदी करायचं जाणून घ्या

---Advertisement---

आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने 21 मे पासून सुरू होणार आहेत. यासाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. प्लेऑफ सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट 499 रुपये आहे. तर सर्वात महाग तिकिटासाठी तुम्हाला 10,000 रुपयापर्यंत मोजावे लागतील. अहमदाबादमध्ये क्लालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना, तर चेन्नईमध्ये क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना होणार आहे. चाहते या सामन्यांसाठी ऑनलाइन तिकीटं खरेदी करू शकतात.

आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट 499 रुपये आहे. तर सर्वात महाग तिकीट 10,000 रुपये आहे. 10,000 रुपयांचं तिकीट असलेले प्रेक्षक प्रीमियम सीटवर बसतील. ही जागा पाचव्या मजल्यावर आहे.

पहिल्या क्वालिफायरनंतर एलिमिनेटर सामना खेळला जाईल. हा सामना 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. एलिमिनेटर सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट 499 रुपये आहे. तर या सामन्याचं सर्वात महाग तिकीट 6000 रुपये आहे. ज्या प्रेक्षकांनी सर्वात महाग तिकिटं खरेदी केली, ते वरच्या गॅलरीत बसतील.

आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी खेळला जाईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट 2000 रुपये आहे. तर सर्वात महाग तिकीट 5000 रुपये आहे. या सामन्याची तिकिटं चार स्वरुपात आहेत. सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग तिकिटांच्या मध्ये 2500 आणि 3000 रुपयांचे तिकीटंही उपलब्ध आहेत.

तिकीट खरेदी कसं करायचं
आयपीएलनं तिकीट विक्रीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. आयपीएलनं ‘X’ या सोशल मीडिया साईटवर पोस्ट शेअर केली की, प्लेऑफ तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. तुम्ही ‘पेटीएम इनसाइडर’वर जाऊन तिकीट खरेदी करू शकता. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई मध्ये खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये असं काय केलंय?”, गौतम गंभीर बरसला; जाणून घ्या काय आहे प्रकरण

18 मे शी विराट कोहलीचं जुनं नातं, या दिवशी चेन्नईचा बँड वाजणार हे निश्चित!

संजू सॅमसनचे असेही चाहते! चक्क घराच्या छतावर काढलं भलं मोठं पेंटिंग; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---