आयपीएल 2024 च्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जवर 2 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्ज 20 षटाकांत 6 गडी गमावून 180 धावाच करू शकली.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघानं केवळ 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नितीश कुमार रेड्डीनं 32 चेंडूत अर्धशतक ठोकत टीमची धुरा सांभाळली. त्यानं 37 चेंडूत सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. तर अब्दुल समदनं 12 चेंडूत 25 धावा केल्या.
नितीश आणि अब्दुल यांनी सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. या भागिदारीनं संघाला 9 विकेट्सवर 182 धावांपर्यंत पोहोचवलं. पंजाब किंग्जकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 29 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. हर्षल पटेल आणि सॅम करननं 2-2 विकेट घेतल्या. तर कागिसो रबाडाला 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंह, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय त्यागराजन, राहुल चहर, ऋषी धवन
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, मयंक मार्कंडे, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबाद विरुद्ध शिखर धवननं पहिल्याचं चेंडूवर केली मोठी चूक, अर्शदीप सिंगनं वाचवली पंजाबची इज्जत
चाहत्यांसाठी वाईट बातमी, अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या मध्यावरच सोडतील संघाची साथ