आयपीएल 2024 च्या 19व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने होते. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं आरसीबीवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 183 धावा केल्या. राजस्थाननं हे लक्ष्य 19.1 षटकांत 4 गडी गमावून गाठलं.
राजस्थानकडून जोस बटलरनं शानदार खेळी खेळली. त्यानं आयपीएल 2024 मधील आपलं पाचवं शतक ठोकलं. तो 58 चेंडूत 100 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानला अखेरच्या षटकात विजयासाठी एका धावेची आवश्यकता होती. जोस बटलर 94 धावा करून क्रिजवर होत्या. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं षटकार ठोकून आपलं शतक पूर्ण केलं आणि राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला.
कर्णधार संजू सॅमसन आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्यानं 42 चेंडूत 69 धावा ठोकल्या. या दरम्यान त्यानं 8 चौकार आणि 2 षटकार हाणले. त्याला मोहम्मद सिराजनं बाद केलं. यशस्वी जयस्वाल आजही काही कमाल करू शकला नाही. तो पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. टॉपलीनं त्याची विकेट घेतली. रियान पराग 4 चेंडूत 4 धावा आणि ध्रूव जुरेल 3 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. आरसीबीकडून टॉपलीनं 4 षटकांत 27 धावा देत 2 बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जोरदार सुरुवात केली. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसनं सलामीला शतकी भागिदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 14 षटकांमध्ये 125 धावा जोडल्या. डू प्लेसिस 33 चेंडूत 44 धावा करून बाद झाला.
यानंतर विराट कोहलीनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानं आयपीएल कारकिर्दीतील आपलं आठवं शतक ठोकलं. तो 72 चेंडूत 113 धावा करून नाबाद राहिला. या दरम्यान त्यानं 12 चौकार आणि 4 षटकार हाणले. मॅक्सवेल 1 आणि पदार्पण करणारा सौरव चौहान 9 धावा करून बाद झाले. कॅमरून ग्रीन 6 चेंडूत 5 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलनं 4 षटकांत 34 धावा देत 2 बळी घेतले. तर नांद्रे बर्गरनं 33 धावा देत एक बळी घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टॉपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थाननं आरसीबीविरुद्धच्या सामन्यात वेगळी जर्सी का घातली? जाणून घ्या कारण
IPL 2024 मधील पहिलं शतक, ‘किंग कोहली’नं जयपूरमध्ये पाडला धावांचा पाऊस!
ग्राउंड्समनच्या मुलानं केलं आरसीबीसाठी आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कोण आहे सौरव चौहान