---Advertisement---

आरसीबीच्या स्वप्नांची धुळधाण करणाऱ्या जोस बटलरच्या शतकाने रचले विक्रमांचे मनोरे, एका क्लिकवर वाचा सर्व रेकॉर्ड । RR Vs RCB

Jos-Buttler-Century-IPL
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स टीमने काल (दि. 6) घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना केला. या सामन्या अगोदर विराट कोहलीच्या तुफानी शतकाच्या जोरावर आरसीबी संघाने धावांचा डोंगर उभारला होता. आरसीबीने विजयासाठी राजस्थान रॉयल्सपुढे 183 धावांचे आव्हान दिले होते. बंगळुरुचे हे आव्हान राजस्थानने 5 चेंडू आणि 6 विकेट राखून पूर्ण केले. राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा होता तो जोस बटलरच्या तुफानी शतकाचा. जोस बटलरच्या या तुफानी शतकाने विक्रमांचेही अनेक मनोरे रचले आहेत. ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Jos Buttler Century And Many Records )

बटलरच्या शतकाने रचले विक्रमांचे मनोरे –
1. आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ 3 खेळाडूंना 6 किंवा त्यापेक्षा जास्त शतके ठोकता आली आहेत. जोस बटलरचा या यादीत समावेश झालाय
2. जोस बटलरने त्याच्या आयपीएलच्या 100 व्या सामन्यात शतक झळकावले आहे. असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. याआधी ही कामगिरी केएल राहुलने केलीये.
3. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने हे दुसरे शतक ठोकले. यासह त्याने विराट आणि बेन स्टोक्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.
4. एका संघासाठी सर्वाधिक वेळा (11 वेळा) सामनावीराचा किताब जिंकण्याचा विक्रम बटलरने केलाय. त्याने राजस्थानकडून अजिंक्य रहाणेचा विक्रम मोडला.
5. आयपीएल इतिहासात वेगवेगळ्या मैदानावर पाच किंवा त्यापेक्षा जास्त शतके जोस बटलर हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

अधिक वाचा –
– IPL 2024 मधील पहिलं शतक, ‘किंग कोहली’नं जयपूरमध्ये पाडला धावांचा पाऊस!
– ‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!
– ग्राउंड्समनच्या मुलानं केलं आरसीबीसाठी आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कोण आहे सौरव चौहान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---