आयपीएल 2024 च्या 24 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्ही आधी गोलंदाजी करू. जर पावसाची परिस्थिती असेल, तर तुम्हाला धावांचा पाठलाग करायले आवडेल. तुमचे प्रमुख खेळाडू जखमी असताना प्लेइंग इलेव्हन सेट करणं सोपं नाही. केन विल्यमसनच्या जागी मॅथ्यू वेड आणि शरथच्या जागी मनोहर आला. मी फलंदाजी करताना कर्णधारपदाचा विचार करत नाही. कर्णधार असताना तुम्हाला खेळाडूंना आत्मविश्वास द्यायचा असतो.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्हालाही आधी गोलंदाजी करायची होती. प्रत्येकाला माहीत आहे की, संघाचं नेतृत्व एकट्यानं करता येत नाही. आम्ही चारही सामने जिंकले असले तरी आमच्यासमोर वेगवेगळी आव्हाने होती.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल
गुजरात टायटन्स – शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स विजयाच्या रथावर स्वार आहे. चालू हंगामात राजस्थान एकमेव संघ आहे ज्यानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सनं सलग चार सामने जिंकले आहेत. संघ आठ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
दुसरीकडे शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सविरुद्ध मोहिमेला विजयानं सुरुवात केली. मात्र पुढील चारपैकी तीन सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. गुजरातचा संघ पाच सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्सचे सलामीवीर रिद्धीमान साहा आणि डेव्हिड मिलर दुखापतीमुळे बाहेर आहेत. गेल्या सामन्यात गुजरातला या दोघांची उणीव भासली. कर्णधार शुबमन गिलनं आतापर्यंत पाच सामन्यांत 183 धावा केल्या आहेत. तर त्याचा सलामीचा जोडीदार बी साई सुदर्शननं आतापर्यंत 191 धावा ठोकल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये लागू होणार नवा नियम; कमकुवत टीमसाठी ट्रॉफी जिंकणे होणार आणखीनच अवघड
भुवनेश्वर कुमारनं रचला इतिहास, अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू