आयपीएल 2024 च्या 38व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. विकेट चांगली दिसते. फ्रँचायझीसाठी 100 वा सामना खेळणं ही अतिशय गौरवाची भावना आहे, मुंबईसोबत माझा प्रवास सुरू झाला होता. मी खूप आभारी आहे. आमच्या संघात तीन बदल – नुवान, वढेरा आणि पियुष चावला टीममध्ये आले आहेत. शेफर्ड, मधवाल आणि श्रेयस गोपाळ बाहेर जातील.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – ही खूप मोठी स्पर्धा आहे, आमच्याकडे पाच दिवसांचा ब्रेक होता आणि आम्ही आमच्या योजनांबद्दल चर्चा केली. आम्ही येथे बरेच सामने खेळले आहेत. आम्हाला माहित आहे की विकेट कशी आहे. मुंबई स्पर्धेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी ओळखली जाते, त्यामुळे आम्हाला चांगलं खेळावं लागेल. आमच्या टीममध्ये संदीप शर्मा परत आला आहे. कुलदीप सेन बाहेर गेला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेअर्स – नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेव्हिस
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर
पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गाडीनं आता वेग पकडला असून संघानं गेल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र, टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सच्या विजयरथला लगाम घालणं त्याच्यासाठी सोपं जाणार नाही. या सामन्यात मुंबईच्या नजरा रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असतील. तर जसप्रीत बुमराहकडून नेहमीप्रमाणेच धारदार गोलंदाजीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, जोस बटलरचं फॉर्ममध्ये परतणं ही राजस्थान रॉयल्ससाठी जमेची बाजू आहे. मात्र युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला अजूनही क्लिक करता आलेलं नाही. अशा परिस्थितीत राजस्थानचा संघ कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्यावर अवलंबून असेल. गोलंदाजीची मदार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या खांद्यावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बाद झाल्यानंतर अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, विराट कोहलीला बीसीसीआयनं ठोठावला मोठा दंड
मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO
“ना फलंदाजीत, ना गोलंदाजीत, त्याचा संघात काहीच उपयोग नाही”; सेहवागनं घेतला सॅम करनचा क्लास