रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स संघाचा शनिवारी (दि. 5) 4 विकेट्सने दारून पराभव केला. गुजरातला पराभूत केल्यानंतर बंगळुरु संघ आता 10व्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर गेला आहे. यासह बंगळुरुच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. या सामन्याच्या निकालानंतर मुंबईला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ आता थेट गुणतालिकेत शेवटच्या स्थानी पोहोचला आहे.
सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या. गुजरातच्या एकाही फलंदाजाने 40 धावांचा आकडा गाठला नाही. गुजरातने 3 बाद 23 धावांसह आयपीएल 2024 मधील पॉवरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्या केली. गुजरातचे पहिले तीन फलंदाज साहा, गिल आणि साई अनुक्रमे 1, 2 आणि 6 धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान (37) आणि डेव्हिड मिलरने (30) संघाचा डाव सावरला. राहुल तेवतियाने 21 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 35 धावा केल्या, त्यामुळे गुजरात 147 धावांचा टप्पा गाठू शकला. आरसीबीकडून सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 2 विकेट मिळवले. तर कर्ण शर्माला एक विकेट मिळवण्यात यश आले. ( IPL 2024 RCB vs GT Match Highlights RCB beat Gujarat Titans by 4 wickets )
गुजरातच्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 92 धावांची भागीदारी रचली. फाफने आरसीबीसाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. फाफने 23 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. विराटने 27 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. यानंतर मात्र विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन हे झटपट बाद झाले. अशात दिनेश कार्तिक पुन्हा एकदा आरसीबीसाठी तारणहार ठरला. दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवून दिला. कार्तिकने 21 धावा केल्या, तर स्वप्निलने 15 धावा केल्या. गुजरातकडून जोशुआ लिटीलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर नूर अहमदने दोन विकेट्स मिळवल्या.
Three wins in a row for @RCBTweets ❤️
They jump to number 7⃣ on the Points Table 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/WEifqA9Cj1#TATAIPL | #RCBvGT pic.twitter.com/Ww9SIkivq0
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2024
अधिक वाचा –
– पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन मैदानावर कधी परतणार? या हंगामात पुन्हा खेळणार की नाही?
– सलग तिसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार आरसीबी, गुजरातकडे मागील पराभवाचा बदला घेण्याची संधी; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग ११
– बर्फाळ दऱ्यांमध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाला ऋतुराज गायकवाड, पाहा चेन्नईच्या कर्णधाराचं हे वेगळं रुप