आयपीएल २०२४ च्या ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस – आम्ही धावांचा पाठलाग करणार आहोत. फलंदाजीच्या दृष्टीकोनातून आम्हाला आमचा मोजो सापडला आहे. खेळाडू आता मुक्तपणे फलंदाजी करतायेत. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आमच्या क्षेत्ररक्षणानं आम्हाला निराश केलं असं मला वाटतं. त्यावर बोलणं झालं आहे. क्षेत्ररक्षण युनिट म्हणून आम्हाला एक चांगला संघ बनण्याची गरज आहे. आमच्या संघात दोन बदल. मानव पदार्पण करत आहे आणि जोश लिटलही येतोय.
दोन्ही संघांच्या प्लेइंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार वैशाख
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुज रावत, महिपाल लोमरोर, आकाश दीप, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल
इम्पॅक्ट प्लेअर्स – संदीप वारियर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव
आजचा सामना जिंकून गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं स्थान मजबूत करू शकतो. तर घरच्या मैदानावरील हा सामना जिंकून आरसीबीसीला सलग तिसरा विजय नोंदवायचा आहे. गुजरात टायटन्सचे १० सामन्यांत ८ गुण असून ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, आरसीबीचा संघ येथून आपले सर्व सामने जिंकूनही दुसऱ्या संघांच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
आजच्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. बंगळुरूमध्ये शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. हवामान खात्यानं शनिवारीही पावसाचा इशारा दिला आहे. सामना पावसानं वाहून गेल्यास गुजरात टायटन्सचं मोठं नुकसान होऊ शकतं.
महत्त्वाच्या बातम्या –
हे ११ खेळाडू तुम्हाला बनवतील मालामाल! या खेळाडूला डोळे बंद करून बनवा कर्णधार RCB vs GT dream 11 team
RCB Vs GT Live : बंगळुरु आणि गुजरात यांच्यात आज ‘कांटे की टक्कर’, दोन्ही संघांना विजय आवश्यक
आयपीएलचे ५ मोठे खेळाडू, ज्यांना या हंगामात एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही