आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी अशी छाप उमटवलीय की, त्यांना कधीही विसरता येणार नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅन्सच्या कायम लक्षात राहत असतात. अशातच IPL 2024 च्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा आरसीबी संघात पुनरागमन करणार आहे.
याबरोबरच यावेळी एबी डिव्हिलियर्स आरसीबीमध्ये नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरु होत आहे आणि पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तसेच एबी डिव्हिलियर्सने 2021 मध्ये आयपीएलला अलविदा केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा डिव्हिलियर्स आरसीबीमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. याबाबत त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला आहे.
याबाबत त्याने विराट कोहलीशीही चर्चा देखील केली आहे. त्यावर डिव्हिलियर्स म्हणाला आहे की, अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, पण मी आयपीएल 2024 साठी भारतात येणार असून तेव्हा मी आरसीबीच्या फलंदाजांसोबत थोडा वेळ घालवावा, अशी विराट कोहलीची इच्छा आहे. अशा परिस्थितीत एबी डिव्हिलियर्सने आता आरसीबीच्या फलंदाजांना मार्गदर्शन केले तर त्यामुळे आरसीबीला काही प्रमाणात ताकद मिळेल.
AB de villiers on virat kohli "Virat Kohli has hinted that he might want me to come over in the ipl just to spend a bit of time with him and some of the batter perhaps." (Ab de villiers YT )
It's confirmed that we will se king kholi in the ipl 😎 #ViratKohli #IPL2024 pic.twitter.com/O7eRZ4AreI
— StumpSide (@StumpSide07) March 6, 2024
दरम्यान, एबी डिव्हिलियर्सने 2021 मध्ये खूप आधी आयपीएलला अलविदा केला होता. पण डिव्हिलियर्सची आयपीएलमधील कामगिरी खूपच चमकदार होती. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 184 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये डिव्हिलियर्सने ५१६२ धावा केल्या होत्या. या काळात एबीने 40 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली होती. एबी डिव्हिलियर्सची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 133 धावा आहे. याबरोबरच आयपीएल दरम्यान विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सची जोडी पाहणे चाहत्यांना पुन्हा पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ बाबतीत अक्षरपेक्षा कुलदीप केव्हाही वरचढ! धरमशालेत फिरकीपटूने नावावर केला मोठा विक्रम
- आगे बढेगा…आगे बढेगा..! धोनी’च्या स्टाईलमध्ये ध्रुव जुरेलने आधीच केला इशारा आणि ओली पोप अडकला जाळ्यात