भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. तर टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. तसेच ध्रुवच्या कसोटी कारकिर्दितला तिसरा सामना आहे. पण आतापर्यंतच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. ध्रुव जुरेल नुसता फलंदाजीनेच नाही तर विकेटच्या मागूनही खेळी करण्यात यशस्वी ठरला आहे. याबरोबरच पाचव्या कसोटी सामन्यात फलंदाजाच्या डोक्यात काय सुरु आहे याचा अंदाच आधीच घेऊन सापळा रचत विकेटकीपर ध्रुव जुरेल याने ओली पोपचा डाव संपवला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 26 वं षटक कुलदीप यादवच्या हाती दिलं होतं. त्यानंतर पहिल्या चेंडूवर क्राउलने एक धाव घेत संघाच्या 100 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर दुसरा चेंडू ओली पोपला निर्धाव टाकला होता. त्यामुळे ओली तो धावांसाठी चान्स घेणार हे ध्रुव जुरेलने ओळखलं होतं. त्याचवेळी तिसऱ्या चेंडूआधीच ध्रुवने कुलदीपला सांगितलं. आगे बढेगा..आगे बढेगा…हे सर्वकाही स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि तसंच काहीसं चित्र पहायला मिळालं आहे.
यामुळे वच्या या खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. टीमला अशाच विकेटकीपरची गेल्या काही वर्षांपासून गरज होती. ध्रुव जुरेलच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होईल अशी आशा आता क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. याबरोबरच कुलदीप यादव याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला आऊट करत पाचवी विकेट पूर्ण केली. कुलदीपच्या कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ ठरली आहे.
Jurel to Kuldeep: “Yeh (Pope) badhega aage, badhega aage”
Next ball 👇pic.twitter.com/WDuYe1rd8r
— Kausthub Gudipati (@kaustats) March 7, 2024
दरम्यान, इंग्लंड संघाने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुलदीप यादव त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. यामुळे पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव संपवला असून पहिल्या दिवसाची दोन सत्रे कशीबशी खेळणाऱ्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावात गारद झाला आहे. तर भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 5 तर आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जडेजाला एक विकेट मिळाली आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा..! इंग्लंड नेस्तानाबूत, भारतीय संघ मजबूत स्थितीत
- सरफराजचं ऐकलं असतं तर झॅक क्रॉली 79 धावा करूच शकला नसता, पाहा रोहित शर्मा कुठे चुकला