---Advertisement---

IPL Retention नंतर कोणाकडे किती रक्कम शिल्लक? जाणून घ्या सर्वच

---Advertisement---

आयपीएल 2024 साठी खेळाडू कायम करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर होती. या अखेरच्या दिवशी सर्व संघांनी रिलीज केलेल्या खेळाडूंची व कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानंतर 12 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या दुसऱ्या ट्रेडिंग विंडोला सुरुवात झाली. या दुसऱ्या ट्रेडिंग विंडोच्या पहिल्या दिवशीच दोन ट्रेड झाल्यानंतर आता सर्व संघांकडे शिल्लक असलेल्या रकमेबाबत खुलासा झाला आहे.

आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी पार पडेल. या लिलावात उतरताना कोणत्या संघाकडे किती रक्कम असेल तसेच किती खेळाडू त्यांना खरेदी करायचे आहेत याबाबत अधिकृत माहिती समोर आली. दुसऱ्या ट्रेडमध्ये मुंबईने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याला 15 कोटींची रक्कम देत आपल्याकडे खेचले. तर, मुंबईने आपला अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याला कोटींमध्ये आरसीबीला ट्रेड केले.

या दोन ट्रेडनंतर आता कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली आहे याबाबत आपण जाणून घेऊ. आयपीएल लिलावात गुजरात टायटन्स सर्वाधिक 38.15 कोटी रुपये घेऊन उतरेल. यामध्ये ते 8 भारतीय व दोन विदेशी खेळाडू खरेदी करू शकतात. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद 34 कोटी रुपये, कोलकाता नाईट रायडर्स 32.7 कोटी रुपये घेऊन लिलावासाठी येतील. त्यांना अनुक्रमे 9 व 16 खेळाडूंना घेण्याची संधी असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स 28.95 कोटींमध्ये 13 खेळाडू तर सीएसके 31.4 कोटींमध्ये 9 खेळाडू खरेदी करू शकते. पंजाब किंग्स 29.1 कोटींमध्ये दहा खेळाडू खरेदी करण्याची क्षमता ठेवते. तर आरसीबीकडे 23.25 कोटींमध्ये दहा खेळाडू खरेदी करण्याची संधी असेल. मुंबई 17.75 कोटींमध्ये 10 खेळाडू, राजस्थान रॉयल्स 14.50 कोटींमध्ये 11 खेळाडू तर लखनऊ 13.75 कोटींमध्ये आठ खेळाडू खरेदी करू शकतात.

(IPL 2024 Retention How Much Remaining Purse For All Teams Ahead IPL 2024 Auction)

हेही वाचा-
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---