ऋषभ पंतबाबत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरु होत्या. अपघात झाल्यापासून मैदानात कधी परतणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण बीसीसीआयने ऋषभ पंतला हिरवा कंदील दिला आहे. इतकंच काय तर महत्त्वाची भूमिका बजवण्यासही सक्षम असणार आहे. तसेच डिसेंबर २०२२ मध्ये पंतचा कार अपघात झाला तेव्हा संपूर्ण देश हादरला. ऋषभ पंतची आई याच चिंतेने त्रस्त होती. याचा खुलासा आता ऋषभ पंतच्या डॉक्टरांनी केला आहे.
30 डिसेंबर 2022 ला दिल्लीहून आपल्या घरी डेहरादूनला जात असताना ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातातून सुदैवाना बचावला आणि 14 महिने मैदानापासून दूर होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि आता फिट अँड फाईन असून क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.
याबरोबरच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याच्या दुखापती आणि 14 महिन्यांच्या वेदनांची कहाणी डॉक्टरांनी सांगितली आहे. तसेच पंतचे डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी सांगितले की, पंतच्या आईला आपला मुलगा चालेल की नाही याची सर्वाधिक काळजी वाटत होती.
यानंतर पंतच्या डॉक्टरांनी पुढे सांगितले आहे की, जेव्हा आम्ही ऋषभ पंतला सांगितले की त्याला बरे होण्यासाठी 18 महिने लागू शकतात, तेव्हा त्याने सांगितले की मी 18 महिने प्रतीक्षा करू शकत नाही. मला 12 महिन्यांत बरे व्हावे लागेल. यासाठी तो काहीही करायला तयार होता. तसेच पंतला 15 महिन्यांत पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
The Greatest Comeback Story
In Part 1 of the #MiracleMan, we chronicle the tireless efforts of the resilient medical team that made @RishabhPant17’s remarkable return to cricket possible. As Rishabh defies the odds in the face of adversity, the men behind the scenes unveil their… pic.twitter.com/9ylCvW2zO8
— BCCI (@BCCI) March 14, 2024
दरम्यान, ऋषभ पंत विकेटकीपर फलंदाज म्हणून फिट असल्याने दिल्ली कॅपिटल्सला फायदा होणार आहे. ऋषभ पंत या स्पर्धेत कर्णधारपद आणि विकेटकीपिंग करताना दिसू शकतो. पण याबाबत अजूनही फ्रेंचायसीने याबाबत काहीही सांगितलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024 : सिक्सर किंगने मुंबई इंडियन्सवर ओढले ताशेर, म्हणाला, ‘रोहित शर्माला आणखी एक संधी…
- IPL 2024 : मोठी बातमी! KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर? मोठे कारण आले समोर